Post Covid Effect : संकटं संपता संपेना! कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका अन् आता बेल्स पॉल्सी ठरतोय घातक; चिंतेत भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 12:07 IST
1 / 16देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या 3,24,24,234 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,948 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 403 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 / 16कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,34,367 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान अनेक संकटं येत आहेत. 3 / 16कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका निर्माण झाला आहे. तसेच आता बेल्स पॉल्सी देखील घातक ठरत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनातून ठिक झाल्यानंतर देखील कोरोना रुग्णांची पाठ सोडत नाही. 4 / 16म्युकोरमायकोसिसनंतर आता बेल्स पॉल्सीचा सर्वाधिक धोका पाहायला मिळत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत याचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 5 / 16मुंबईत राहणाऱ्या 55 वर्षीय एका व्यक्तीला 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. मात्र उपचारानंतर ते ठीक झाले. 31 जुलै रोजी त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस देखील घेतला आहे. 6 / 16लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या व्यक्तीच्या कुटुंबाला त्याच्या चेहऱ्यावा लकवा मारलेला दिसला. त्यांना उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर सध्या त्यांच्यावर उपचार करत आहेत. 7 / 16न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रुग्णाला याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्याने पाणी पिण्यासाठी आणि खाण्यासाठी खूप त्रास होत असल्याचं सांगितलं. 8 / 16डॉ. मखीजा यांनी रुग्णाला बेल पाल्सीची लागण झाल्याचं म्हटलं आहे. व्हायरल इन्फेक्शन झाल्याने कोरोना रुग्णाला याची लागण झाली आहे. लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 16वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इन्साकॉगने बुलेटिन जारी करून डेल्टा व्हेरिएंटवर चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत 72 हजारांहून अधिक सँपल्सचं जीनोम सीक्वेंसिंग करण्यात आलं आहे.10 / 1620 हजारांहून अधिक सँपल्समध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. रिपोर्टनुसार, देशात 72931 सँपलचं जीनोम सीक्वेंसिंग करण्यात आलं. त्यातील 30230 जणांमध्ये कोरोनाचे गंभीर व्हेरिएंट आढळून आले आहेत.11 / 16इन्साकॉगनुसार, आतापर्यंत डेल्टा व्हेरिएंटमध्ये 13 म्यूटेशन झाले आहेत. ज्यातील पाच भारतातही आहेत. अमेरिका, ब्रिटन, चीनसह 100 हून अधिक देशांमध्ये डेल्टाचे रुग्ण आढळून आले आहेत.12 / 16रिपोर्टनुसार, 6.7 कोटी लोकसंख्या असलेल्या ब्रिटनमध्ये आतापर्यंत 18 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1.20 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली असून देखील ते संक्रमित झाले आहेत.13 / 16जगभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. अशातच लस आणि साईड इफेक्टची चर्चा रंगली आहे. अनेकांनी साईड इफेक्टच्या भीतीने लस घेण्यास नकार दिला आहे.14 / 16कोरोना व्हायरस आणि लस याबाबत युद्धपातळीवर संशोधन केलं जात असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशाच एका रिसर्चमधून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोरोना लसीमुळे पॅरालिसिसचा धोका अत्यंत कमी असल्याची माहिती आहे.15 / 16कोरोना लसीचे अनेक फायदे असल्याचंही रिसर्चमध्ये म्हटलं आहे. हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी इनएक्टिवेटेड लस जर एक लाख लोकांना दिली तर 4.8 टक्के लोकांना या चेहऱ्याच्या पॅरालिसिसचा धोका असल्याचं म्हटलं आहे.16 / 16लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये संशोधकांनी याला बेल्स पाल्सी असं म्हटलं आहे. ज्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजुला लकवा मारला जातो. पण या आजाराची लक्षणं सहा महिन्यांच्या आत नष्ट होतात.