शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Independence Day: मोदींचं आजवरचं तिसरं सर्वात मोठं भाषण, ८८ मिनिटं बोलले; २९ वेळा शेतकऱ्यांचा उल्लेख अन् 'या' शब्दाचा सर्वाधिक उच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 15:44 IST

1 / 9
स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन सर्वाधिक वेळ संबोधित केलं. ८८ मिनिटांच्या भाषणात मोदींनी शेतकरी, युवा, दलित, ओबीसी इत्यादी मुद्द्यांवर भाष्य केलं.
2 / 9
यासोबतच मोदींनी आत्मनिर्भर भारत, अमृत उत्सव संकल्पाचाही उल्लेख केला. मिळालेल्या माहितीनुसार मोदींनी दिलेल्या ८८ मिनिटांच्या भाषणात 'भारत' शब्द सर्वाधिक म्हणजेच ६६ वेळा उच्चारला.
3 / 9
पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भाषणानुसार त्यांनी आज आपल्या भाषणात २९ वेळा शेतकरी, १७ वेळा योजना शब्दांचा उल्लेख केला. तर गाव, स्वातंत्र्य आणि उत्पादन या शब्दांचा प्रत्येकी १५ वेळा उच्चार केला.
4 / 9
लाल किल्ल्यावरुन मोदींनी दिलेलं भाषण त्यांच्या आजवरच्या भाषणांपैकी तिसरं सर्वाधिक मोठं भाषण ठरलं आहे. याआधी मोदींनी २०१६ साली ९४ मिनिटांचं भाषण दिलं होतं.
5 / 9
२०१४ साली पंतप्रधान मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यावर्षी त्यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर ६५ मिनिटांचं भाषण दिलं होतं.
6 / 9
त्यानंतर २०१५ साली ८८ मिनिटं, २०१६ साली ९४ मिनिटं, २०१७ साली ५६ मिनिटं, २०१८ साली ८३ मिनिटं, २०१९ साली ९२ मिनिटं भाषण दिलं होतं.
7 / 9
पंतप्रधान मोदींनी यंदाच्या भाषणात ६६ वेळा भारत शब्दाचा उल्लेख केला. तर योजना शब्द १७ वेळा उच्चारला. याशिवाय स्वातंत्र्य आणि उत्पादन शब्द प्रत्येकी १५ वेळा उच्चारला. अमृत महोत्सव आणि संकल्प शब्दाचा १४ वेळा उल्लेख केला.
8 / 9
जल, सहकार, खेळ, भाषा, कोरोना हे शब्द प्रत्येकी ११ वेळा उच्चारले. तर शिक्षण, कायदा या शब्दांचा मोदींनी १० वेळा उल्लेख केला. ७५ व्या स्वातंत्र्य दिन, परिवर्तन, उत्साह या शब्दांचा उल्लेख ९ वेळा केला.
9 / 9
मोदींनी आपल्या भाषणात काश्मीर, आयुष्यमान भारत, ओबीसी, दलित, मागासवर्गीय, ग्लोबल, स्टार्टअप, तंत्रज्ञान या शब्दांचा प्रत्येकी ७ वेळा उल्लेख केला. तर अर्थव्यवस्था, सुधारणा, रेल्वे शब्दांचा उल्लेख ५ वेळा केला. यासोबतच आरक्षण, पर्यावरण, रुग्णालय, लहान मुलं, लोकसंख्या, रोजगार, आत्मनिर्बर, विक्रेता, वैज्ञानिक आणि कर या शब्दांचा प्रत्येकी ३ वेळा उल्लेख केला.
टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदी