भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 06:23 IST
1 / 10पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून भारतात केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे सिंधू जलवाटप करार तातडीने स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यामुळे पाकच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर सिमला करार स्थगितीने भारतविरोधी कारवायांत वाढ होण्याची भीती आहे. पाक चीन किंवा अन्य देशांची मदत मागू शकतो.2 / 10सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकिस्तानातील शेती उद्ध्वस्त, हाहाकार माजेल - पाकिस्तानातील सुमारे ८० टक्के शेतजमीन ही सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.3 / 10जर भारताने पाणी रोखले तर पाकिस्तानातील शेती उद्ध्वस्त होऊन त्याचा २३.७ कोटी लोकांच्या जीवनावर भीषण परिणाम होणार आहे. कराची, लाहोर, मुल्तानसारखी शहरे सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तेथेही पाण्याच्या टंचाईमुळे धूळधाण उडण्याची शक्यता आहे.4 / 10कराराच्या स्थगितीनंतर शेतीवर विपरीत परिणाम होऊन येथील अन्नधान्य उत्पादनात घट होऊ शकते. त्याचा कोट्यवधी लोकांना फटका बसेल. पाकिस्तानातील शहरांतली जलपुरवठा व्यवस्था कोलमडून तिथे अशांतता निर्माण होऊ शकते. 5 / 10काय आहे सिंधू जल करार? - तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकचे लष्करप्रमुख जनरल अयुब खान यांच्यात कराचीमध्ये सप्टेंबर १९६० मध्ये सिंधू जल करार झाला. त्यानुसार भारताला सिंधू आणि तिच्या उपनद्यांपैकी १९.५ टक्के पाणी वापरण्याचा अधिकार आहे, तर पाकिस्तानला सुमारे ८० टक्के पाणी मिळते. भारत स्वतःच्या वाट्याच्या पाण्यापैकीसुद्धा फक्त ९० टक्केच पाणी वापरतो. 6 / 10सिमला करार स्थगितीने भारतविरोधी कारवायांत वाढ होण्याची भीती - भारताला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने सिमला करार गुरुवारी स्थगित केला. दोन्ही देश आपले वाद शांततेने आणि परस्पर संवादाच्या माध्यमातूनच सोडवतील. यात कोणताही तिसरा देश हस्तक्षेप करणार नाही, असे यात ठरले होते.7 / 10पण, आता हा करार स्थगित झाल्याने पाकिस्तान भारताविरोधात चीन किंवा अन्य कोणत्याही देशाची मदत घेण्याची शक्यता आहे. यामुळे भारतविरोधी कारवाया वाढण्याची भीती आहे. 8 / 10तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी २ जुलै १९७२ रोजी एका ऐतिहासिक करारावर सह्या केल्या. तो ‘सिमला करार’ या नावाने ओळखला जातो. 9 / 10या तरतुदी आहेत सिमला करारात - काश्मीरमधील नियंत्रण रेषा एकतर्फी बदलली जाणार नाही आणि दोन्ही देश तिचा सन्मान करतील. एकमेकांविरोधात हिंसा, युद्ध किंवा दुष्प्रचार केला जाणार नाही.10 / 10शांततेने सहअस्तित्व कायम राखण्याचा तसेच संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सिमला करारात म्हटले आहे. या करारानंतर भारताने युद्धबंदी असलेले ९०,००० पाकिस्तानी सैनिक आणि युद्धात जिंकलेली जमीन त्या देशाला परत केली.