Omicron Variant : टेन्शन वाढलं! ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 मुळे येणार कोरोनाची आणखी एक लाट?; तज्ज्ञ म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:46 IST
1 / 14वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 42 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 428,590,976 वर पोहोचली आहे. 2 / 14कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 5,927,544 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी चिंता वाढवली आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. 3 / 14ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 बाबत विविध प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारातील BA.2 हा सब-व्हेरिएंट हा Omicron या मूळ प्रकारापेक्षा वेगाने पसरत असल्याचं म्हटलं जात आहे. 4 / 14भारताचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि राष्ट्रीय IMA कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. BA.2 सब-व्हेरिएंटमधून दुसरी लाट अपेक्षित नाही असं म्हटलं आहे.5 / 14इतकेच नाही तर ज्या लोकांना आधीच BA.1 सब-व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे त्यांना पुन्हा संसर्ग होऊ शकत नाही असंही सांगितलं. तसेच BA.2 हा व्हायरसही नाही किंवा नवा स्ट्रेन देखील नसल्याचं म्हटलं आहे. 6 / 14BA.1 सब-व्हेरिएंटपेक्षा अधिक संक्रमणीय आहे. म्हणजेच ते खूप वेगाने पसरू शकते. पण यामुळे दुसरी लाट येणार नाही. राजीव यांचे हे विधान प्रख्यात एपिडेमियोलॉजिस्ट डॉ एरिक फीगल-डिंग यांच्या इशाऱ्यानंतर आले आहे. 7 / 14जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) त्यांनी BA.2 सब व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित करण्यास सांगितलं. एरिक यांनी BA.2 सब व्हेरिएंटने गंभीर रोग होण्याची क्षमता आहे असं म्हटलं होतं. 8 / 14जपानमध्ये केलेल्या प्रयोगशाळेतील प्रयोगांचा हवाला देत डॉ. एरिक यांनी असेही सांगितले की BA.2 सब व्हेरिएंट कोरोनाच्या डेल्टा प्रकाराइतकाच धोकादायक असू शकतो. त्यांनी BA.2 सब-व्हेरिएंटला वाईट बातमी म्हटलं आहे.9 / 14जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वी सांगितले होते की BA.2 सब-व्हेरिएंट आधीच्या सब-व्हेरिएंटपेक्षा जास्त ट्रान्समिसिबल आहे, परंतु गंभीर नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 10 / 14WHO मधील कोरोनाच्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन केरखोवा यांनी एका व्हिडिओमध्ये सर्व सब व्हेरिएंटमध्ये BA.1 पेक्षा BA.2 अधिक संक्रमित आहे. तथापि, तीव्रतेच्या बाबतीत कोणताही फरक नाही असं सांगितलं आहे. 11 / 14जपानमधील शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की BA.2 हे Omicron प्रकार असल्याचे मानले जाते. परंतु, त्याचा जीनोमिक क्रम BA.1 पेक्षा खूप वेगळा आहे. हे सूचित करते की BA.2 ची विषाणूशास्त्रीय वैशिष्ट्ये BA.1 पेक्षा वेगळी आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 14कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील लोकांना वेगाने संक्रमित केले आहे. या व्हेरिएंटने ज्यांना यापूर्वी कोविड झाला होता किंवा ज्यांनी लस घेतली आहे. त्या लोकांनाही आपल्या जाळ्यात ओढलं आहे.13 / 14जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले आहे की ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे, विशेषत: जे लोक पूर्वी कोविड झाले आहेत ते सहजपणे पुन्हा संसर्गाचे बळी होऊ शकतात. तथापि, याबद्दल फार मर्यादित माहिती आहे.14 / 14कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग टाळण्यासाठी, कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. डॉ गोयल यांच्या मते, जी व्यक्ती कोरोना नियमावलीचे पालन करत नाही, ज्याला वेळेवर लसीकरण झाले नाही, त्यांना धोका आहे.