Omicron symptoms: दुर्लक्ष नको! ही असू शकतात कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 14:46 IST
1 / 8 गेल्या दोन वर्षापासून भारतासह जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने अद्यापही जगाची चिंता वाढवली आहे. मधल्या काळात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला होता, पण आता कोरोनासह ओमायक्रॉन आपले डोके वर काढत आहे.2 / 8 कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या पाहता तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या परिस्थितीमुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. 3 / 8 तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल घडू लागला आहे. आता त्वचा, ओठ आणि नखे यांच्या रंगांत अचानक बदल झाल्यास त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. आता हेदेखील कोरोनाचे लक्षणे असू शकते.4 / 8 कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा त्याची लक्षणे वेगळी होती. सर्दी, ताप, घशात खवखव करणे ही साधारण लक्षणे कोरोनाची होती. पण, नंतर कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आल्यावर ही लक्षणे बददली. 5 / 8 पण, आता ओमायक्रॉन आल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची लक्षणे वेगळी असल्याचे समोर आले आहे. याची लक्षणे कोरोनाच्या मूळ विषाणूंपेक्षा वेगळी आहेत. 6 / 8 तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनच्या प्राथमिक लक्षणांमध्ये नाक गळणे, डोकेदुखी, ताप येणे, घसा खवखवणे आणि वास व चवीच्या भावना नष्ट होणे, क्वचित वेळी त्वचेवर पुरळ येणे, अतिसार किंवा डोळे येणे हे आहेत.7 / 8 वरील लक्षणांशिवाय, त्वचा, ओठ आणि नखांवर पिवळा, करडा किंवा निळा रंग येणे ही कोरोनाची दुर्मीळ लक्षणे आहेत, असे समजले जाते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल.8 / 8 याशिवाय, आता आपल्याला पूर्वीप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. मधल्या काळात लसीकरण झाल्यानंतर अनेकजण कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीत, पण आता त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.