ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 23:31 IST
1 / 5जगातील सर्वात मोठ्या रेल्वेमार्गांपैकी एक असलेली भारतीय रेल्वे ही दिवसागणिक आधुनिकतेचे नवनवे टप्पे गाठत आहे. एकीकडे बुलेट ट्रेनसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असतानाच आता देशातील हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी हरयाणामधील जिंद येथील रेल्वे कारखान्यात घेण्यात आली. उत्तर रेल्वेच्या अभियंत्यांनी या चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.2 / 5हा डबा पूर्वी डिझेलवर चालणाऱ्या ट्रेनमध्ये वापरला जात असे. त्याला डेमू कोच असं संबोधलं जात असे. मात्र आता त्यामध्ये असा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे तो डिझेलऐवजी हायड्रोजनवर चालणार आहे. म्हणजेच यासाठी कुठलाही नवा कोच तयार करण्यात आला नाही, तर जुन्याच कोचला नव्या सिस्टिमध्ये परिवर्तित करण्यात आलं आहे. 3 / 5 हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामधून कुठलंही प्रदूषण होत नाही. जेव्हा ट्रेन हायड्रोजनवर चालते तेव्हा त्यामधून केवळ पाण्याची वाफ निघते. तसेच कुठलाही विषारी वायू बाहेर उत्सर्जित होत नाही. तसेच ट्रेन चालवण्याचा खर्चही कमी होतो.4 / 5हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनच्या इंजिनामधील प्रक्रियेचा विचार करायचा झाल्यास, ही एक स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे. या कोचमध्ये एक खास उपकरण लावलं जातं. त्याला हायड्रोजन फ्लुएल सेट सिस्टिम म्हणतात. यामध्ये हायड्रोजन गॅस टँकमध्ये भरला जातो. तर ऑक्सिजन हा हवेतून घेतला जातो. जेव्हा या दोन्ही वस्तू आपापसात मिळतात. तेव्हा एक केमिकल रिअॅक्शन होते. त्यामुळे तीन गोष्टी घडतात. पहिली म्हणजे वीज तयार होते. दुसरी गोष्ट म्हणजे उर्जा बाहेर निघून जाते. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याची वाफ उत्सर्जित होते. 5 / 5ट्रेनच्या कोचमध्ये किंवा त्याच्यासोबत एक हायड्रोजनचा टँक असतो. यामध्ये उच्च दबावाखाली हायड्रोजन भरला जातो. तसेच आवश्यकतेनुसार तो गॅस फ्युएल सेलमध्ये पाठवला जातो. तिथे विजेची निर्मिती होते. या संपूर्ण ट्रेनमध्ये एक बॅटरी असते. जेव्हा ट्रेनला अधिक उर्जेची आवश्यकता असते, तेव्हा बॅटरीकडून उर्जेचा पुरवठा होतो. तक जेव्हा उर्जेची कमी आवश्यकता असते, तेव्हा फ्युएल सेल बॅटरीला चार्ज करते.