शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निसर्गाचा आविष्कार! अनेक वर्षांनंतर काठमांडू व्हॅलीतून दिसले माऊंट एव्हरेस्टचे पर्वत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 16:10 IST

1 / 10
कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, अनेक देशांनी लॉकडाऊन केलेलं आहे. भारतातल्याही अनेक राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. तसेच वाहतुकीची वर्दळही दिसेनाशी झाली आहे.(सर्व छायाचित्र- आभूषण गौतम)
2 / 10
बरेच जण घरीच बंदिस्त झाल्यामुळे निसर्गानंही मोकळा श्वास घेतला आहे. निसर्ग आणि नद्यांनी स्वतःचं शुद्धीकरण करून घेतलं असून, हवेतील प्रदूषण जवळपास नष्ट झाल्याचं चित्र आहे.
3 / 10
हवा एवढी स्वच्छ झाली आहे की, एकदम दूरवरचे डोंगरही सुस्पष्ट दिसू लागले आहेत.
4 / 10
विशेष म्हणजे वातावरणातील हवा स्वच्छ झाल्यामुळे भारतातल्या वेगवेगळ्या भागातून हिमालयाच्या पर्वतरांगांचं दर्शन होत आहे.
5 / 10
सोशल मीडियावरही असे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. आता नेपाळच्या काठमांडू घाटीतून माऊंट एव्हरेस्टचे नयनरम्य पर्वत स्पष्टपणे नजरेत पडत आहेत.
6 / 10
नेपाळ टाइम्सनं हे फोटो ट्विट केले असून, लॉकडाऊनमध्ये नेपाळ आणि उत्तर भारतातली हवा स्वच्छ झाल्याचंही ट्विटमध्ये म्हटलं आहे.
7 / 10
अनेक वर्षांनी काठमांडू घाटीतून हे माऊंट एव्हरेस्टचे पर्वत स्पष्ट दिसू लागले आहेत. काठमांडूही माऊंट एव्हरेस्ट जवळपास २०० किलोमीटर दूर आहे.
8 / 10
हे नयनरम्य छायाचित्र फोटोग्राफर आभूषण गौतम यांनी कॅमेऱ्यात कैद केले आहेत. अनेक युजर्सनी असं दृश्य दिसणं शक्य नसल्याचंही सांगितलं आहे.
9 / 10
कारण माऊंट एव्हरेस्टच्या मार्गात अनेक डोंगर येतात, असा काही युजर्सचा दावा आहे.
10 / 10
पण तरीही आभूषणनं काढलेले फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEverestएव्हरेस्ट