शत्रूच्या मिसाईल्स, रॉकेटवर आता भारताचा ‘ध्रुव’ ठेवणार नजर, पाकिस्तान-चीनची तर खैर नाही, अशी आहेत वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 18:21 IST
1 / 8भारत १० सप्टेंबर रोजी आपले पहिले मिसाईल ट्रॅकिंग शिप ध्रुव लाँच करणार आहे. आण्विक आणि बॅलेस्टिक मिसाईल्सना ट्रॅक करणारे हे भारताचे हे पहिलेच जहाज असेल. त्याबरोबरच हे तंत्रज्ञान बाळगणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल विशाखापट्टणम येथे ध्रुव जहाजाचे अनावरण करणाक आहेत. 2 / 8क्षेपणास्त्रांना ट्रॅक करणारे हे जहाज रडार आणि अंटिनाने सुसज्जित असतात. त्यांचे काम शत्रूच्या मिसाईल्स आणि रॉकेट ट्रॅक करण्याचे असते. ट्रॅकिंग शिपची सुरुवात अमेरिकेने केली होती. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धामधून उरलेल्या नौकांना ट्रॅकिंग शिपमध्ये परिवर्तित केले होते. 3 / 8डीआरडीओ, एनटीआरओ आणि भारतीय नौदलाने मिळून ध्रुव हे जहाज विकसित केले आहे. ध्रुव जहाज तयार करण्याचे काम हे २०१४ मध्ये सुरू करण्यात आले होते. २०१८ मध्ये त्याची बांधणी पूर्ण झाली होती आणि अखेर २०१९ मद्ये त्याची समुद्रामध्ये चाचणी करण्यात येऊ लागली. 4 / 8ध्रुव जहाज हे रडार टेक्नॉलॉजीमधील सर्वात अद्ययावत तंत्र असलेल्या इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड अरे रडार्सने युक्त आहे. त्या माध्यमातून शत्रूचे सॅटेलाईट्स, मिसाईलची क्षमता आणि टार्गेटपासून त्याचे अंतर या सर्वांची माहिती घेता येते. ध्रुव आण्विक क्षेपणास्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासह भूस्थिर सॅटेलाईस्टनाही आरामात ट्रॅक करू शकते. 5 / 8१० सप्टेंबर रोजी कमिशन होणाऱ्या जा नौकेच्या माध्यमातून दोन हजार किमीवर चहुबाजूंनी लक्ष ठेवता येणार आहे. अनेक रडार्सनी सुसज्ज असलेल्या या जहाजाच्या माध्यमातून एका पेक्षा अधिक लक्ष्यांवर अचून नजर ठेवता येऊ शकते. तसेच या जहाजांच्या माध्यमातून येणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या माध्यमातून ध्रूव त्यांचे अचूक लोकेशन सांगू शकतो. 6 / 8ध्रुव जहाजाच्या रडार डोममध्ये X बँड रडार लावण्यात आले आहेत. तसेच दूरच्या अंतरावर लक्ष ठेवण्यासाठी त्यामध्ये S बँड रडार लावण्यात आले आहेत. या माध्यमातून हाय रिझॉल्युशनवर टार्गेटला पाहणे, जेमिंगपासून वाचणे आणि लांबच्या अंतरापर्यंत स्कॅन करणे शक्य होते. तसेच जहाजामधून चेतकसारख्या बहुउपयोगी हेलिकॉप्टरचेही संचालन होऊ शकते. 7 / 8भारताने ध्रुव प्रोजेक्टची माहिती अत्यंत गुप्त ठेवली होती. तसेच हे जहाज जगाच्या नजरेपासून दूर ठेवले होते. याचे कोडनेम VC -11184 असे ठेवण्यात आले होते. हे नाव विशाखापट्टणममधील यार्ड नंबर म्हणून दिले गेले होते. मेक इन इंडिया इनिशिएटिव्हअंतर्गत विशाखापट्टणममध्ये एक बंद डॉकयार्डमध्ये ध्रुवची बांधणी करण्यात आली आहे. 8 / 8ध्रुव हे जहाज भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे जहाज आहे. इंटर कॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक मिसाईल्सना ट्रॅक करण्यासाठी ध्रुव जहाज अत्यंत उपयुक्त आहे. मात्र भारताला अशा प्रकारच्या अनेक जहाजांची आवश्यकता आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.