By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 00:52 IST
1 / 13जगातील महान फुटबॉलर लिओनेल मेस्सीने भारत दौऱ्यावर असताना बुधवारी वन्यजीवांसाठी आश्रयस्थान असलेल्या वनतारा अभयारण्याला भेट दिली.2 / 13मेस्सीने जेव्हा वनतारा अभयारण्यात पाऊल ठेवले तेव्हा अनंत अंबानी यांनी त्याची गळाभेट घेतली आणि अतिशय प्रेमाने सर्वांचे स्वागत केले.3 / 13मेस्सी, त्याचा इंटर मियामी संघातील सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल या सर्वांचे भव्य पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.4 / 13वनतारामध्ये या खास पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट अंबानी दोघेही जातीने हजर होते.5 / 13वनतारामध्ये प्रवेश करताच मेस्सीने दर्शनी भागात असलेल्या गणपतीबाप्पाला नमस्कार केला.6 / 13वनतारामध्ये विविध हिंदू देवदेवतांची मंदिरे आहेत. सनातन धर्मानुसार, हिंदू देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन मेस्सीने या भेटीला सुरूवात केली.7 / 13वनताराच्या आतल्या बाजूला आल्यानंतर मेस्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंबे माता पूजा, गणेश पूजा, हनुमान पूजा, शिवाभिषेक आणि महाआरती केली.8 / 13वनतारामध्ये प्रवेश केल्यानंतर मेस्सी आणि त्याचे साथीदार वन्यजीवांशी खेळण्यात रमल्याचे दिसले.9 / 13मेस्सीने वन्यप्राण्यांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. तसेच जिराफाला आपल्या हाताने खाद्य देण्याचाही आनंद लुटला.10 / 13फुटबॉलच्या मैदानात वाघाप्रमाणे प्रतिस्पर्धी संघावर चाल करून जाणारा मेस्सी वनतारामध्ये खऱ्या वाघाशी खेळताना दिसला.11 / 13वनताराची खासियत असलेल्या व्हाईट टायगरसोबतही मेस्सीने खास फोटोशूट केले.12 / 13त्याशिवाय, जंगलाचा राजा सिंह याच्यासोबत फुटबॉलच्या मैदानाचा राजा असलेल्या मेस्सीने वेळ घालवला13 / 13मेस्सी आपल्या फुटबॉल स्किल्स दाखवताना दिसला. त्याने उपस्थितांनाही फुटबॉल खेळण्याबाबत टिप्स दिल्या.