नारळाच्या झाडांवर संकट! हवामान बदलामुळे गगनाला भिडले दर, केरळचे पारंपरिक उत्पन्न संकटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:05 IST
1 / 8नारळाचे उत्पादन घटल्याने केरळमधील शेतकरी आणि पारंपरिक उद्योग धोक्यात आले आहेत. आज केरळमध्ये पुरेसा नारळ मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे आता शेजारील तामिळनाडू राज्यावर अवलंबून राहावे लागत आहे.2 / 8गेल्या वर्षी ३० रुपयांपेक्षा कमी दरात मिळणारा एक नारळ आज ७० ते ७२ रुपये प्रतिनारळ दराने मिळत आहे. परिणामी, नारळ तेलाचा भाव ४०० ते ४१० रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे.3 / 8केरळ हे नावच 'केरा' (नारळ) या शब्दावरून पडले आहे. पण, आज 'गॉड्स ओन कंट्री' ही आपली ओळख गमावण्याच्या भीतीशी झगडत आहे, कारण नारळाचे उत्पादन आणि झाडांची संख्या सातत्याने घटत आहे.4 / 8उत्पादन घटण्याची काही प्रमुख कारणे देखील आहेत. कमी वेळेत होणारी अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा यांचा नारळाच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे.5 / 8हवामान बदलामुळे 'रेड पाम वीविल' नावाच्या कीटकांचा धोका वाढला आहे. हे कीटक झाडांना आतून पोकळ करतो, ज्यामुळे झाडे मरतात. तसेच मोठ्या संख्येने नारळाच्या शेतजमिनीवर इमारती, अपार्टमेंट्स आणि विला बांधले जात आहेत.6 / 8नारळाच्या झाडांची योग्य सफाई करणारे आणि कीटकांना नियंत्रित ठेवणारे प्रशिक्षित मजूर आता मिळत नाहीत. प्रवासी मजुरांकडून किंवा मशीनद्वारे काम केले जाते, पण ते झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचत नाहीत.7 / 8किंमती वाढल्यामुळे सामान्य नागरिकांनी नारळाची खरेदी कमी केली आहे. तसेच, अनेक रेस्टॉरंट्सनी नारळ तेल सोडून आता दुसऱ्या तेलांचा वापर सुरू केला आहे.8 / 8या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन नारळाची झाडे लावणे, कुशल मजुरांकडून झाडांची नियमित सफाई करणे, योग्य खते वापरणे आणि बांधकाम कार्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, केरळचे हे नैसर्गिक सौंदर्य आणि अर्थकारण गंभीर संकटात सापडेल.