हिमवृृृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद ; हिमाचल, उत्तराखंडमध्ये बर्फाची चादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 21:36 IST
1 / 7जम्मू आणि काश्मीरच्या मºयाच भागांत सोमवारी हिमवृष्टी झाली. यामुळे जम्मू-श्रीनगर हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे. या हिमवृष्टीमुळे काश्मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे. 2 / 7काझिगुंड भाागात मोठ्या प्रमाणावर बर्फ साचला असल्याने, महामार्ग बंद करण्यात आला आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. परिवहन विभागाने जम्मू आणि काझिगुंडमध्ये चेक पोस्टवर वाहने थांबविली आहेत.3 / 7वैष्णादेवीकडे जाणा-या मार्गावरही हिमवृष्टी झाल्याने तो रस्ता भाविकांसाठी बंद केला आहे. त्यामुळे वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेले भाविक अडकून पडले आहेत. हिमवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावर खराब दृश्यमानतेमुळे विमान उड्डाणात अडथळे आले. सध्याची दृश्यमानता येथे जेमतेम ६०० मीटर अंतर आहे. या हिवाळ्यातील काश्मिरातील ही सर्वात मोठी हिमवृष्टी असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ३८ वर्षांतील ही सर्वाधिक हिमवृष्टी आहे. रस्त्यांवरील बर्फ हटविण्यासाठी अनेक अडथळे येत आहेत.4 / 7सिमला परिसरात सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. काही ठिकाणी रस्ते खुले झाले आहेत. रामपूर जाणा-या बसेस बसंतपूरच्या मार्गे वळविण्यात आल्या आहेत. सिमला शहरात मात्र सर्व रस्ते खुले आहेत. आगामी दोन दिवस पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.5 / 7हिमाचल प्रदेशच्या डोंगरी भागात सोमवारी सकाळपासून अधूनमधून बर्फवृष्टी होत आहे. राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे. सिमलाच्या डोंगरी भागात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाले असून, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.6 / 7उत्तराखंडांमध्येही ब-याच भागांमध्ये हिमवृष्टी झाली असून, काही भागांत पाऊ सही झाला. 7 / 7त्यामुळे बद्रिनाथ, केदारनाथ येथे जाण्याचे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.