1 / 12प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनी यंदाच्या रमजान ईदला खेरदी करण्याऐवजी गरिबांना मदतीचं आवाहन केलंय2 / 12देशात यंदा २५ मे रोजी रमजान ईद साजरी होत आह, मात्र यंदाच्या ईदवर कोरोनाचं सावट आहे3 / 12कोरोनामुळे देशात ३१ मे पर्यंत लॉकाडाऊन घोषित करण्यात आला आहे, त्यामुळे रमजान ईदला गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे4 / 12रमजानचा महिना हा मुस्लीम बांधवांसाठ दसरा-दिवाळीप्रमाणेच असतो. मात्र, यंदा लॉकडाऊन असल्याने ईद साध्या पद्धतीने साजरी होणार आहे5 / 12रमजानच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत असते. मुस्लीम बांधव आणि महिलांची खेरदीसाठी झुंबड उडते 6 / 12बांगड्या, कपडे आणि ज्वेलरी खरेदीसाठी गरीबांपासून ते श्रीमंतांची लगबग पहायला मिळते7 / 12हैदराबादमधील चारमिनार येथे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत असते, पण यंदा लॉकडाऊनमुळे हे मार्केट बंद राहणार आहे8 / 12यंदा २५ मे रोजी चंद्र दिसल्यानंतर ईदची अधिकृत घोषणा होईल, त्यानंतर देशभरात ईद साजरी केली जाईल9 / 12कोरोनाच्या महामारीमुळे ईद घरच्याघरीच साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलंय, प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनीही गरिबांना मदत करण्याचं सूचवलंय10 / 12लॉकडाऊनमुळे गरीब, मजूर वर्गाचे मोठे हाल होत आहेत, अनेकांना खायला अन्न नाही, तर घराचं भाडं देणंही कठिण बनलंय11 / 12म्हणूनच राहत इंदौरी यांनी ईदची खरेदी करण्याऐवजी आजारी लोकांना मदत करा, कुणाला त्याच्या घरापर्यंत पोहोचवा12 / 12कुणाचं घरभाडं भरा तर कुणाला किराणा भरुन द्या, असं आवाहन राहत इंदौरी यांनी केलंय. आम्हीही तसंच करत आहोत, तुम्हीही तेच करा असे त्यांनी म्हटलंय