शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवीन संसदेचे लोकसभा सभागृह तयार, पहिल्यांदाच समोर आले फोटो; पुढील अर्थसंकल्प इथेच मांडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 4:21 PM

1 / 6
नवीन संसद भवनाचे (New Parliament) दालन तयार आहे. लोकसभा सभागृहाचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये लोकसभा अतिशय भव्य आणि प्रशस्त दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या वर्षी संसदेच्या नवीन इमारतीत राष्ट्रपतींचे संयुक्त अभिभाषण करण्याची तयारी करत आहे.
2 / 6
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही (Budget Session) संसदेच्या नवीन सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसदेच्या सभागृहात आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे.
3 / 6
अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतात. दुसऱ्या दिवशी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळी नवीन इमारतीत अर्थसंकल्प सादर होईल, अशी अपेक्षा आहे.
4 / 6
नवीन संसद भवन सध्याच्या संसद भवनापेक्षा मोठे, आकर्षक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. 64,500 चौरस मीटरमध्ये बांधले जाणारे नवीन संसद भवन बांधण्याचे काम टाटा प्रोजेक्ट करत आहे.
5 / 6
संसद भवनाच्या नवीन इमारतीमध्ये ऑडियो व्हिज्युएल सिस्टम तसेच डेटा नेटवर्क सुविधेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये 1,224 खासदार बसण्याची सोय आहे.
6 / 6
म्हणजेच एकावेळी 1,224 खासदार बसू शकतात. यामध्ये लोकसभेत 888 तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात. नवीन इमारतीत सेंट्रल हॉल असणार नाही. दोन्ही सभागृहांच्या खासदारांना लोकसभेच्या सभागृहातच बसता येणार आहे. नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे.
टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाBudgetअर्थसंकल्प 2023New Delhiनवी दिल्ली