By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 21:36 IST
1 / 4सहा धाडसी महिला नौसैनिकांसह जगभ्रमंतीवर निघालेल्या भारतीय नौदलाच्या ‘आयएनएसव्ही तारीणी’ला पॅसिफिक समुद्रात वादळाचा सामना करावा लागला. 2 / 4मात्र नौदलाच्या साहसी वीरांगनांनी या वादळाचा धैर्याने सामना करत सुखरूपपणे वादळातून वाट काढली.3 / 4वादळात सापडल्यावर नौकेवर नियंत्रण राखताना महिला नौसैनिक.4 / 4 १0 सप्टेंबर २0१७ रोजी गोव्यातील ‘आयएनएस मांडवी’ तळावरुन केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी या बोटीला बावटा दाखवून परिक्रमेचा शुभारंभ केला होता. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याचा ही पहिलाच प्रयत्न असून यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. स्वदेशी बनावटीच्या छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत जग भ्रमंतीसाठी निघाल्या आहेत. हा संपूर्ण प्रवास २१,६00 सागरी मैल अंतराचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी १६५ दिवस लागणार आहेत.