1 / 10महाराष्ट्रातील कोयनेच्या खोऱ्यात ११ डिसेंबर १९६७ रोजी हा भूकंप झाला. त्याची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १८0 लोक ठार झाले. २५ कि.मी.च्या पट्ट्यात भूकंपाने विनाश घडवून आणला होता. कोयना खोरे महाराष्ट्रातील सर्वाधिक भूकंपप्रवण असून तेथे सातत्याने भूकंप होत असतात. येथील सर्वांत ताजा भूकंप १४ एप्रिल २0१४ रोजी झाला होता.2 / 10२0 ऑक्टोबर १९९१ रोजी आलेल्या या भूकंपाचे केंद्र उत्तराखंडमधील गढवालमध्ये होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.८ इतकी होती. त्यात १ हजार लोक ठार झाले. १३00 गावांतील ४२ हजार घरे त्यात उद्ध्वस्त झाली. संपूर्ण उत्तराखंडमध्ये त्यामुळे विनाश झाला.3 / 10१२ जून १८९७ रोजी सायंकाळी ५.११ वा. आसाममध्ये भूकंप आला. त्याकाळी तंत्रज्ञान एवढे प्रगत नसल्यामुळे त्याचे केंद्र अज्ञात आहे. त्याची तीव्रता ८.१ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १५00 लोक ठार झाले. भारतातील आसामसह तिबेट आणि तत्कालीन ब्रह्मदेश (म्यानमार) या देशांना भूकंपाचा फटका बसला.4 / 10१५ ऑगस्ट १९५0 रोजी म्हणजेच ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा भूकंप झाला. सायंकाळी ७.३९ वा. संपूर्ण आसाम आणि तिबेट या भूकंपाने हादरला. याचे केंद्र तिबेटमधील रिमाजवळ होते. त्याची तीव्रता ८.६ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १५२६ लोक ठार झाले. भूकंपानंतर लगेच आलेल्या पावसाने आसामात पूरस्थितीही निर्माण केली होती.5 / 10३0 सप्टेंबर १९९३ रोजी मध्यरात्री लातूरमध्ये भूकंप झाला. महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ त्याचे केंद्र होते. त्याची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. तीव्रता तुलनेने कमी असली तरी नुकसान मात्र खूपच जास्त झाले. ९७४८ लोक ठार झाले. हजारो घरे उद्ध्वस्त झाली. लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात ही हानी झाली. गणेश उत्सवाच्या समाप्तीच्या दिवशीच हा भूकंप झाला होता.6 / 10४ एप्रिल १९0५ रोजी सकाळी ६.१0 वा. आलेल्या या भूकंपात हिमाचल प्रदेशातील कांग्रा भाग उद्ध्वस्त झाला. याचे केंद्र हिमालयात होते. रिश्टर स्केलवर ७.८ इतकी त्याची तीव्रता होती. २0 हजार लोकांचा बळी घेणाऱ्या या भूकंपात १ लाखापेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त झाली.7 / 10२६ जानेवारी २00१ रोजी सकाळी ८.५0 वा. गुजरातमध्ये भूकंप घडला होता. भारतभर प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना गुजरातवर ही आपत्ती कोसळली. कच्छमध्ये त्याचे केंद्र होते. २0 हजार लोक त्यात ठार झाले. हजारो घरे उद्ध्वस्त झाली. जनजीवन पूर्वपदावर यायला ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला.8 / 10१५ जानेवारी १९३४ रोजी दुपारी २.१३ वा. झालेल्या या भूकंपाचे केंद्र हिमालयातील एव्हरेस्ट शिखराच्या दक्षिणेला होते. त्याची तीव्रता ८.७ रिश्टर स्केल इतकी होती. भारत आणि नेपाळ अशा दोन्ही देशांत त्याने विध्वंस घडविला. ३0 हजार लोक त्यात मरण पावले. भूकंपग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी महात्मा गांधी तेव्हा बिहारात गेले होते.9 / 10८ ऑक्टोबर २00५ रोजी सकाळी ८.५0 वा. झालेल्या या भूकंपाचे केंद्र पाकव्याप्त काश्मिरातील मुजफ्फराबादजवळ होते. त्याची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी होती. १३0000 लोक त्यात ठार झाले. भारतातील काश्मीरमध्ये जीवित हानीचे प्रमाण पाकच्या तुलनेत कमी होते. चीन अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान येथेही नुकसान झाले.10 / 10२६ डिसेंबर २00४ रोजी सकाळी ८.५0 वा. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळ खोल समुद्रात हा भूकंप झाला. त्याची रिश्टर स्केलवरील तीव्रता ९.१ ते ९.३ इतकी होती. भूकंपाने त्सुनामीचे तांडव निर्माण केले. भारतासह इंडोनेशिया थायलंड मालदीव आणि सोमालिया या देशांत मिळून २८३१0६ लोक यात ठार झाले. तसेच भयानक विध्वंस झाला. चेन्नईतील मरिना बीचवर त्सुनामीने विनाश घडवून आणला.