भारतानं विक्रमी ८५ दिवसांत नागरिकांना दिले लसीचे १० कोटी डोस; पाहा अमेरिका-चीनपेक्षा किती दिवस पुढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 09:34 IST
1 / 15गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याचे आरोप केले जात आहेत.2 / 15परंतु अशा परिस्थितीतही भारतानं विक्रमी कामगिरी केली आहे. भारत हा जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहीम राबवणारा देश बनला आहे. 3 / 15देशात केवळ ८५ दिवसांच्या विक्रमी वेळेत नागरिकांना १० कोटी डोस देण्यात आले आहेत.4 / 15दरम्यान, अमेरिकेत ८९ दिवसांत तर चीनमध्ये १०२ दिवसांमध्ये १० कोटी डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी दिली. 5 / 15जागतिक स्तरावर केल्या जाणाऱ्या लसीकरणात भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. 6 / 15देशात दररोज सरासरी ३८ लाख ९३ हजार २८८ लसींचे डोस दिले जात असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं. 7 / 15अमेरिकेनं ८५ दिवसांणद्ये ९ कोटी २० लसींचे डोस दिले, तर चीन आणि ब्रिटननं या कालावधीत अनुक्रमे ६ कोटी १० लाख आणि २ कोटी १० लाखांपेक्षा अधिक लसीचे डोस दिले. 8 / 15दरम्यान, पंतप्रधान कार्यालयानंदेखील यासंदर्भातील एक चार्ट जारी केला आहे. तसंत कोरोनामुक्त भारतसाठी हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 9 / 15केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत करण्यात आलेल्या लसीकरणापैकी ६०.६२ टक्के लसीकरण ८ राज्यांमध्ये करण्यात आलं आहे. 10 / 15यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. 11 / 15देशात १६ जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली होती. 12 / 15त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात फ्रन्टलाईन व्हर्कर्सना लसीकरण करण्यात आलं. 13 / 15त्यानंतर मार्च महि्यात ६० वर्षांपेक्षा अधिक आणि त्यानंतर ४५वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. 14 / 15गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोबाधितांची नोंद होत आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत सरसकट लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी अनेकांकडून करण्यात येत आहे.15 / 15तर दुसरीकडे आता कमी वयातील मुलांनाही कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात यावं अशी मागणी होत आहे.