By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 14:15 IST
1 / 13मंगळवारी इंधनाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. 29 जूनपासून पेट्रोल 29 पैश्यांनी तर डिझेलची किंमत 28 पैश्यांनी वाढली आहे.2 / 13देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरूच आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची ३५ पैसे दरवाढ केली आहे. या महिन्यात १४ वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. 3 / 13दरवाढीनंतर सात राज्यांची राजधानी असलेल्या शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. उच्चांकी दरांमुळे त्रस्त झालेल्या जनतेला मोदी सरकारकडून दिलासा मिळू शकतो. 4 / 13सरकारकडून पेट्रोल, डिझेलवर करकपातीची शक्यता आहे. मुंबई पेट्रोलचे दर १०४.२२ रुपये प्रति लीटर झाले. तर डिझेलही ९६.१६ रुपये प्रति लीटरवर पोहोचले. 5 / 13देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. दिल्लीत पेट्रोल ९८.११ रुपये तर डिझेलचे दर ८८.६५ रुपये प्रति लीटर झाले आहेत. 6 / 13चेन्नईही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. चेन्नईत पेट्रोल ९९.१९ रुपये, तर डिझेल ९३.२३ रुपये प्रति लीटरवर पोहोचले. कोलकाता येथे पेट्रोल ९७.९७, 7 / 13बंगळुरू येथे १०१.३९ आणि जयपूर येथे १०४.८१ रुपये प्रति लीटर झाले. पेट्रोलची शंभरी असलेल्या राजधानी असलेल्या शहरांमध्ये बिहारच्या पाटणा आणि केरळच्या तिरुवनंतपुरमचा समावेश झाला आहे. 8 / 13लॉकडाऊनमुळे अगोदरच महागाईच्या खाईत सापडलेला सर्वसामान्य नागरिक इंधन दरवाढीमुळे तीव्र संताप व्यक्त करत आहे. केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी नानाविध पद्धतीने निषेध नोंदवल जात आहे. 9 / 13गुजरातच्या वडोदरा येथील टीम रीव्हॉल्युशन या संस्थेने इंधन दरवाढीवर निषेध नोंदवण्यासाठी अनोखा मार्ग पत्करला आहे. ग्राहकांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळणार आहे. 10 / 13पेट्रोल मिळविण्यासाठी एकच अट आहे. ग्राहकांनी वंदे मातरम आणि भारत माती की जयच्या घोषणा द्यायच्या आणि एक रुपयांत पेट्रोल डिझेल घेऊन जायचे. 11 / 13 टीम रीव्हॉल्युशन संस्थेने 300 लिटर डिझेल पेट्रोल वाटण्याचे जाहीर केले आहे. सोमवर सकाळी अकरा वाजल्यापासून ही योजना सुरू झाली आहे. 12 / 13इंधन दरवाढीच्या निषेधात सामान्य नागरिक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख स्वेजल व्यास यांनी केले आहे. 13 / 13एक लिटर पेट्रोलचे 300 कूपन विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. जो ग्राहक वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देईल, त्यांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळेल असेही त्यांनी सांगितले.