इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 22:44 IST
1 / 7जीएसटीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. २२ सप्टेंबरपासून १२ आणि २८ टक्के जीएसटीच्या वस्तू यापुढे शून्य, ५ आणि १८ टक्क्यांना विकल्या जाणार आहेत. परंतू, २२ सप्टेंबरपूर्वी पॅक झालेला माल असेल, किंवा त्या तारखेपूर्वी विकण्यासाठी तयार केलेला माल असेल तर तो कोणत्या दराने विकला जाणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण त्या मालावर आधीचीच एमआरपी असणार आहे. मग दुकानदार नवीन करानुसार किंमत कमी करून विकणार की जुन्या किंमतीनुसार विकणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 2 / 7सर्वात मोठा पेच किराना दुकान, गिफ्ट दुकान आदींसोबत निर्माण होणार आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस कमीच होत असतात. त्यामुळे त्यांची एमआरपी आणि विक्रीची किंमत ही कधीच सारखी नसते. परंतू, किराना दुकानांमध्ये ज्या वस्तू विकल्या जातात त्या बहुतांश वेळा एमआरपीवरच विकल्या जातात. 3 / 7या दुकानांमध्ये एमआरपीनुसार वस्तू आधीपासूनच उपलब्ध आहेत. दुकानदार या वस्तू कशा विकणार, कारण या दुकानदारांकडे बिल देण्याची पद्धत नसते. तोंडी किंमत सांगून ग्राहक पैसे देत असतात. यामुळे गोंधळ उडणार आहे. विविध वस्तूंच्या किंमती देखील मॅनेज केल्या जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून त्यांनी ज्या दराने वस्तू घेतल्या आहेत, त्या दरासह फायदा जोडून त्या विकल्या जाण्याची शक्यता आहे. 4 / 7उदा. एका वस्तूचा पुडा १० रुपयाने घेतला असेल त्यावरील जीएसटी २८ टक्के असेल तर ती खरेदी किंमत वाढवून त्यात नवा जीएसटी दाखवून एकूण विक्री किंमत तीच ठेवली जाऊ शकते. म्हणजेच ग्राहकांना जुन्या मालावर जीएसटी कपातीचा लाभ मिळण्याची शक्यता यामुळे कमी होते. अर्थात सर्वच दुकानदार असे करतील असे नाही. परंतू, यामुळे वादाचे प्रकारही वाढण्याची शक्यता आहे. 5 / 7दुसरीकडे आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत जुना स्टॉक घालविण्यासाठी मोठे डिस्काऊंटही जाहीर होण्याची म्हणजेच क्लिअरन्स सेल लागण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबरनंतर दुकानदारांना नव्या जीएसटीनुसारच बिलिंग करावे लागणार आहे. 6 / 7गोदरेज अप्लायन्सेसचे कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांच्यानुसार २२ सप्टेंबरपासून नव्या जीएसटी दरानेच बिलिंग होणार आहे. दुकानदार किंवा डीलरना जुन्या मालावर झालेले नुकसान इनपुट टॅक्स क्रेडिटद्वारे मिळण्याची शक्यता आहे. 7 / 7म्हणजे त्यांना यासाठी अप्लाय करावा लागणार आहे. ही आकडेमोड खूप क्लिष्ट असणार आहे. आयटीसी एक प्रकारचे क्रेडिट असते जे त्यांना जीएसटी भरण्यासाठी मदत करते.