म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लक्ष दिव्यांनी उजळला गंगा घाट, देवदिवाळीला दिसला काशीचा असा थाट
By बाळकृष्ण परब | Updated: November 30, 2020 21:34 IST
1 / 9देव दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. दरम्यान, यावर्षी देवदिवाळीनिमित्त गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांवर लाखो दिवे पेटवण्यात आले होते. 2 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेब्रुवारीनंतर वाराणसीत आले होते. लॉकडाऊननंतर मोदी पहिल्यांदाच वाराणसीमध्ये आले होते. या दौऱ्यात मोदींनी ५० किमी प्रवास हवाई मार्गाने तर ४० किमी प्रवास रस्तेमार्गाने केला. 3 / 9 कार्तिक पौर्णिमेला वाराणसीमध्ये देवदिवाळीचे आयोजन हे शेकडो वर्षांपासून होत आले आहे. या दिवशी देवतांनी शिवशंकराच्या नगरीत दिवाळी साजरी केल्याची मान्यता आहे. म्हणून हिला देव दिवाळी म्हणतात. 4 / 9आज काशी श्रद्धेच्या रंगात रंगलेली दिसून आली. मोदींनी आदच्या देवदिवाळी महोत्सवाचे औपचारिक उदघाटन केले. यावेळी मोदींनी मंदिरांच्या संकेतस्थळांचेही उदघाटन केले. 5 / 9 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात जावून पूजा केली. त्यानंतर मोंदींनी कॉरिडॉर प्रोजेक्टचा आढावा घेतला. तसेच दीप दान केले. 6 / 9देवदिवाळीनिमित्त वाराणसीत करण्यात आलेली दिव्यांची सुंदर आऱास. 7 / 9दिव्यांच्या आराशीने उजळलेला गंगा घाट 8 / 9वाराणसीमधील दीपोत्सवाचे एक विहंगम दृश्य 9 / 9वाराणसीमधील गंगा घाट