1 / 10 पूर्व किना-यावर हुदहुद वादळाने थैमान घातले आणि आंध्र प्रदेश व ओरिसाच्या किनारी भागाला चांगलाच फटका बसला.2 / 10हरयाणामध्ये ९० पैकी ४७ जागा जिंकत भाजपाला बहुमत मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले जगदीश खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.3 / 10४० जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा देत शिवसेनेची गोची केली आणि या बळावर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.4 / 10भाजपानं प्रथमच स्वबळावर महाराष्ट्रात निवडणुका लढवल्या आणि मोदी लाटेवर स्वार होत १२३ जागा जिंकल्या.5 / 10आघाडी टिकवण्यासाठी अजित पवारांवर कारवाई केली नाही तर आदर्शप्रकरणी कारवाई केली असती काँग्रेस दुभंगली असती अशी वादग्रस्त विधाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत केली.6 / 10कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई या दोघांना शांततेचे नोबेल पारितोषक जाहीर झाले आणि भारतात आनंदाला उधाण आलं.7 / 10दसरा आनंदाचा सण परंतु तो बिहारमध्ये दु:खाचा ठरला. पाटण्यातील गांधी मैदानात पाच लाख लोक जमले होते. विजेची जिवंत तार पडल्याची अफवा पसरली आणि चेंगराचेंगरीत ३२ जण मरण पावले तर ५० जण जखमी झाले.8 / 10भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला हरवत १७व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि ऑलिंपकमधला प्रवेशही निश्चित केला. यावेळी भारतीय संघाचा कप्तान सरदार सिंग.9 / 10भारतीय बॉक्सर मेरी कोमने इंचेऑनमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि अजून आपण पूर्ण भरात असल्याचे दाखवून दिले.10 / 10दहशतवादाचा बिमोड करण्यापासून ते व्यापार वाढवण्यापर्यंतच्या अनेक मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची चर्चा झाली आणि भारत व अमेरिकेचे संबंध आणखी सुधारल्याचे दिसून आले.