शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची सोपी पद्धत; या स्टेपने करा प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:38 IST

1 / 9
देशात रेशन कार्डद्वारे मोफत धान्याचे वाटप करण्यात येते. आता हे वाटप ऑनलाईन केले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत, रेशन कार्डचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
2 / 9
या आधी २०१३ मध्ये देशातील कार्डधारकांनी रेशन कार्डचे ई-केवायसी केले होते. २०१३ पासून १० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. नियमानुसार दर ५ वर्षांनी ई-केवायसी आवश्यक आहे. या डिजिटल युगात, तुम्ही घरी बसून तुमचे ई-केवायसी सहजपणे करू शकता.
3 / 9
ई-केवायसीसाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. सर्वात आधी तुम्हाला केवायसी आणि आधार फेसआरडी डाउनलोड करावे लागेल. यानंतर अॅप उघडा आणि लोकेशन एंटर करा.
4 / 9
त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक, कॅप्चा आणि मिळालेला ओटीपी टाकावा लागेल. त्यानंतर सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर फेस-ई-केवायसी पर्याय निवडा.
5 / 9
त्यानंतर कॅमेरा चालू होईल, फोटोवर क्लिक करा आणि तो सबमिट करा. शेवटी तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.
6 / 9
अनेक कार्ड धारकांनी त्यांचे ई-केवायसी आधीच केले असेल, पण त्यांचे ई-केवायसी झाले आहे की नाही याबद्दल गोंधळ होऊ शकतो. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स वापरून ई-केवायसी स्थिती तपासू शकता.
7 / 9
आधी तुम्हाला My KYC अॅप उघडावे लागेल. त्यानंतर ठिकाण टाकावे लागेल. त्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा आणि ओटीपी एंटर करा. जर तुमचे केवायसी झाले असेल, तर तुम्हाला स्टेटसमध्ये Y लिहिलेले दिसेल.
8 / 9
याशिवाय, तुम्ही रेशन कार्डचे ई-केवायसी ऑफलाइन देखील करू शकता. जर तुमचे मोबाईल अॅप काम करत नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही जवळच्या रेशन दुकानातून ई-केवायसी करू शकता.
9 / 9
यासाठी तुम्हाला रेशन दुकानात जावे लागेल. तिथे तुमचा अंगठा किंवा बोटांचा ठसा पीओएस मशीनद्वारे घेतला जाईल. यासोबत तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड देखील सोबत ठेवावे लागेल. तुमच्या अंगठ्याचा किंवा बोटाचा ठसा घेऊन पडताळणी केली जाईल. त्यानंतर तुमचे ई-केवायसी होईल.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान