पंतप्रधान निवासस्थानी गायीने दिला गोंडस वासराला जन्म; मोदींनी ठेवलं खास नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 14:51 IST
1 / 6पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानातील काही खास फोटो आज शेअर केले आहेत.2 / 6पंतप्रधानांच्या निवासस्थानी असलेल्या गायीने नुकतेच एका गोंडस वासराला जन्म दिला. 3 / 6या वासरासोबतचे फोटो शेअर करत नरेंद्र मोदी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.4 / 6लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी एका नव्या सदस्याचे आगमन झालं असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.5 / 6'आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंय की, 'गाव: सर्वसुख प्रदा:'. लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवास कुटुंबात एका नवीन सदस्याचे आगमन झालं. पंतप्रधान निवासात असलेल्या गोमातेने एक वासराला जन्म दिला आहे. तिच्या कपाळावर ज्योतीचे निशाण आहे. त्यामुळे मी तिचे नाव दीपज्योती ठेवलं आहे', अशी माहिती मोदी यांनी दिली आहे.6 / 6 दरम्यान, पंतप्रधान मोदी हे एका फोटो या गोंडस वासराचे चुंबन घेतानाही दिसत आहेत.