Omicron Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळं तिसरी लाट येण्याचा धोका; केंद्र सतर्क तर राज्यात निर्बंध लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 16:54 IST
1 / 10कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या १८-२० महिन्यांनंतर जगातील अनेक देश प्री कोविड फेजमध्ये परतत आहेत. अशावेळी दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉन(B.1.1.529) नं शिरकाव केल्यानं अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.2 / 10वैज्ञानिकांनी भीती व्यक्त केलीय की, हा व्हेरिएंट नियंत्रणात आलेल्या कोरोना महामारीला पुन्हा हवा देऊ शकतो. या व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देशात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणून काही ठिकाणी निर्बंध, लॉकडाऊन पुन्हा लावण्यात आले आहेत.3 / 10दक्षिण आफ्रिकेत ओमीक्रॉन व्हेरिएंटचे १०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन हळूहळू सर्वत्र पसरत चालला आहे. आतापर्यंत कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट होता. पण आता ओमीक्रॉन व्हेरिएंट त्यापेक्षा जास्त वेगाने पसरू शकतो असं वैज्ञानिकांना वाटतं. 4 / 10ओमीक्रॉन व्हेरिएंटमुळे वैज्ञानिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. कारण हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा ७ पट वेगाने पसरण्याचा अंदाज आहे. इतकचं नाही तर लोकांमध्ये संक्रमित करण्याचा धोका डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमीक्रॉन व्हेरिएंटमध्ये जास्त आहे.5 / 10मिळालेल्या माहितीनुसार, या व्हेरिएंटची ओळख पटल्यापासून आतापर्यंत त्याचे ३२ म्यूटेट झाले आहेत. भारतात सध्या या व्हेरिएंटचा कुठलाही रुग्ण आढळला नाही. परंतु परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कठोर तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत.6 / 10ओमीक्रॉन व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देशात चिंता पसरली आहे. एकापाठोपाठ एक अशा अनेक देशांनी प्रवासावर निर्बंध आणले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या ऑस्ट्रिया, कॅनडा, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, इटली, नेदरलँडसारख्या देशातील प्रवाशांवर बंदी आणली आहे. 7 / 10जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार समितीने दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच समोर आलेला नव्या व्हेरिएंट सर्वात वेगाने पसरणारा चिंताजनक व्हेरिएंट असल्याचं म्हटलं आहे. ग्रीक वर्णमालेसह त्याला ओमीक्रॉन नाव दिलं आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्रच्या आरोग्य संस्थेने याबाबत घोषणा केली. 8 / 10कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हाच डेल्टा व्हेरिअंट कारणीभूत होता. यामुळे वेगाने पसरणारा आणखी एक धोकादायक व्हेरिअंट सापडल्याने हा व्हेरिअंट डेल्टापेक्षा जास्त धोकादायक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ओमीक्रॉनमुळे अनेक देशांना प्रभावित क्षेत्रातून प्रवासावर बंदी आणण्याची आवश्यकता भासली आहे.9 / 10दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना महाराष्ट्र सरकारने दिल्या आहेत.10 / 10WHO मते, आतापर्यंत या व्हेरिएंटच्या जवळपास १०० जीनोम सिक्वेंन्सिंगची सूचना मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हेरिएंटची लागण झालेल्या अनेकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले होते. त्याहून धक्कादायक म्हणजे इस्त्रायलच्या ज्या व्यक्तीला नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे त्याला बुस्टर डोसही मिळाला होता.