By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 12:03 IST
1 / 10देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.2 / 10कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात दुसरी लाट आली होती. आता डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा विषाणू सातत्यानं आपल्या रुपात बदल करत आहे. त्यामुळे लक्षणंदेखील बदलत आहेत.3 / 10ब्लॅक, व्हाईट, ग्रीन फंगसनंतर आता कोरोना रुग्णांना साइटोमेगालो विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. विष्ठेवाटे रक्त पडत असल्याचा त्रास रुग्णांना होत आहे. 4 / 10दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात साइटोमेगालोची लागण झालेले पाच जण दाखल झाले. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून एकावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर तिघांवर अँटिवायरल थेरेपीच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत.5 / 10कोरोनाची लागण झालेल्यांना साइटोमेगालोची लागण झाल्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना साइटोमेगालोची लागण होण्याचा जास्त धोका आहे.6 / 10मानवी शरीरात अनेक विषाणू असतात. वातावरणात अनेक प्रकारचे विषाणू असतात. मात्र रोगप्रतिकारशक्ती उत्तम असल्यानं शरीर या विषाणूंचा सामना करतं. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार क्षमता अपुरी असते, त्यांना हा त्रास होतो, अशी माहिती गंगाराम रुग्णालयाच्या गॅस्ट्रोइंट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर अनिल अरोरा यांनी दिली.7 / 10कोरोना झालेल्या अनेकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे पोस्ट कोविड परिस्थितीतून जाणाऱ्यांना साइटोमेगालोचा धोका असल्याचं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.8 / 10साइटोमेगालोची लागण झालेले ५ रुग्ण सर गंगाराम रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती अरोरा यांनी दिली. या पाचपैकी कोणाचंही ट्रान्सप्लान्ट झालेलं नाही. त्यांना कर्करोगासारखा गंभीर आजारदेखील झालेला नाही. 9 / 10देशातील ८० ते ९० टक्के लोकांच्या शरीरात साइटोमेगालो विषाणू असतो. मात्र तो शरीराचं नुकसान करत नाही. कोरोनाची लागण झालेल्यांची रोगप्रतिकारशक्ती होते. त्यामुळे हा विषाणू शरीराला धोका पोहोचवतो, अशी माहिती डॉ. अरोरा यांनी दिली.10 / 10अशा प्रकारची समस्या निर्माण झाल्यास रुग्णांनी घाबरू नये. हा त्रास बरा होण्यासारखा आहे. अँटीव्हायरल थेरेपीच्या माध्यमातून त्यावर मात करता येते. अशा प्रकारचा त्रास झाल्यास रुग्णांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा, असं आवाहनही डॉ. अरोरा यांनी केलं.