शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: गंभीर रुग्णांच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा; कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या हाती ब्रह्मास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 3:26 PM

1 / 9
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही आठवड्यांपासून घसरण होत आहे. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळेच लसीकरण अभियानाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
2 / 9
एका बाजूला कोरोना लसीकरणाचा गती देण्याचा प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला कोरोनाचा सामना करण्यासाठी विविध उपचारपद्धतींचा वापर केला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना बेड न मिळाल्यानं त्यांचा उपचारांअभावी मृत्यू झाला. तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
3 / 9
कोरोना रुग्णांवर सिंगल डोस कॉकटेल औषध प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. या औषधामुळे रुग्ण वेगानं बरे होत असल्याचं पुण्यातील डॉक्टरांनी सांगितलं.
4 / 9
गेल्या २ आठवड्यांत पुण्यातील चार वेगवेगळ्या रुग्णालयातील ६ रुग्णांना मोनोक्लोनल अँटिबॉडीच्या सिंगल डोस कॉकटेल देण्यात आलं. नवं औषध देण्यात आल्यानंतर गंभीर लक्षणं असलेले रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
5 / 9
मोनोक्लोनल अँटिबॉडीची निर्मिती प्रयोगशाळेत केली जाते. शरीरावर विषाणूचा हल्ला झालेला असताना मोनोक्लोनल अँटिबॉडी रोगप्रतिकारशक्ती म्हणून काम करतात.
6 / 9
मोनोक्लोनल अँटिबॉडीमुळे रुग्ण लवकर बरे होतात. मोनोक्लोनल अँटिबॉडीच्या सिंगल डोस थेरेपीसाठी ६० हजार रुपये मोजावे लागतात.
7 / 9
'आम्ही मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल थेरेपीच्या माध्यमातून आम्ही २ रुग्णांवर उपचार केले. दोघांमध्ये काही गंभीर लक्षणं होती. मात्र तरीही त्यांनी उपचारांचा उत्तम प्रतिसाद दिला,' अशी माहिती संक्रामक रोग तज्ज्ञ महेश लाखेंनी दिली.
8 / 9
दोन रुग्णांपैकी एक जण ८३ वर्षांचे होते. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुफ्फुसांचा आजार होता. तर दुसरी रुग्ण एक महिला होती. तिचं वय ७० वर्षे होतं. त्यांना किडनीसह मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं होती. या दोन्ही रुग्णांनी अँटिबॉडी कॉकटेल थेरेपीला उत्तम प्रतिसाद दिला.
9 / 9
दोन्ही रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तीन दिवसांत त्यांच्या शरीरात लक्षणं दिसली. पुढील आठवड्याभरात त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांच्या अवस्था पाहता गंभीर स्वरुपाचं संक्रमण होण्याचा धोका होता. मात्र अँटिबॉडी कॉकटेल थेरेपीमुळे ७ दिवसांत ते पूर्णपणे बरे झाले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या