By सायली शिर्के | Updated: October 7, 2020 09:43 IST
1 / 14कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच आता देशवासियांना थोडा दिलासा मिळत आहे. कोरोनाचा वेग काही राज्यात मंदावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 2 / 14कोरोनाच्या संकटात आता आनंददायक आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 56 लाख 62 हजार 491 लोक बरे झाले आहेत.3 / 14गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. यासोबतच गुड न्यूज म्हणजे देशाच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झाली आहे. 4 / 1430 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 6.8 टक्के झाला आहे. तसेच एका आठवड्यात देशात तब्बल 80 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.5 / 14कोरोना रुग्णांमध्ये ही घट झालेली पाहायला मिळाली आहे. रिपोर्टनुसार, 2 ते 8 सप्टेंबरदरम्यान देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 8.3 टक्के होता. 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान हाच आकडा 9.2 टक्के झाला. त्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट वाढताना दिसला. 6 / 14गेल्या 3 आठवड्यांपासून देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 6.8 टक्के आहे. केंद्र सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या मते, देशात आतापर्यंत सुमारे 8 कोटी 80 लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.7 / 14गेल्या आठवड्यात सर्वात जास्त लोक रिकव्हर झाले. गेल्या दोन आठवड्यांत देशातील कोरोना व्हायरस केस होल्डही 10 लाखांपेक्षा कमी आहेत. 8 / 14थंडी आणि सणासुदीचे दिवस असल्याने लोकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहान राजेश भूषण यांनी केलं आहे. मंगळवारी 61 हजार 267 नवे रुग्ण सापडले तर, 884 लोकांचा मृत्यू झाला. 9 / 14गेल्या 26 दिवसांत, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 10.17 लाखांवरून ती 9.19 लाखांवर पोहोचली आहे. देशात सध्या 9 लाख 19 हजार 023 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.10 / 14सलग तिसऱ्या दिवशी मृतांचा आकडा कमी झाला आहे. आतापर्यंत देशात 1 लाख 3 हजार 569 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 75 हजार 675 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 14देशातील अनेक राज्यांत कोरोनाचा वेग मंदावतो आहे. जवळपास 25 राज्यांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनातून ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.12 / 14आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशांमध्ये भारताचा मृत्यू दर हा सर्वात कमी आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा आता 84.34 टक्के झाला आहे. तर मृत्यू दर हा 1.55 टक्के आहे. 13 / 14इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एका दिवशी 10,89,403 नमुन्यांची चाचणी केली जाते. तसेच आतापर्यंत एकूण 8,10,71,797 नमुन्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.14 / 14देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 66 लाखांवर पोहोचली. तर आतापर्यंत 1 लाख 3 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत.