शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: युद्ध जिंकणार! डिसेंबरपर्यंत बाजारात कोरोनाची लस येणार, चीनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 10:03 PM

1 / 10
कोरोनाच्या संक्रमणाचा जगभरात फैलाव करणाऱ्या चीननंच आता एक आनंदवार्ता दिली आहे.
2 / 10
चीननिर्मित कोरोना लस या वर्षाच्या अखेरीस बाजारात येऊ शकते, असा दावा सरकारच्या मालमत्ता पर्यवेक्षण आणि प्रशासन आयोगाने (एसएएसएसी) केला आहे.
3 / 10
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एसएएसएसीने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या वेचॅटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
4 / 10
अहवालानुसार वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्टने ही लस तयार केली आहे.
5 / 10
चाचणीदरम्यान 2000 लोकांना ही लस देण्यात आली होती. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस ही लस बाजारात येऊ शकते, असे एसएएसएसीने म्हटले आहे.
6 / 10
ही लस क्लिनिकल चाचणीच्या दुस-या टप्प्यात पोहोचली आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स हे सरकारच्या फार्मास्युटिकल ग्रुप सिनोफार्माशी संबंधित आहेत.
7 / 10
एसएएसएसी सिनोफार्माच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवते.
8 / 10
अहवालानुसार, बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स एका वर्षात 10 ते 12 कोटी डोस लस तयार करू शकते. चीनमध्ये एकूण 5 कोरोना विषाणूच्या लसींवर चाचण्या सुरू आहेत.
9 / 10
परंतु बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या लसीवर इतर कोणत्याही कंपनीने प्रतिक्रिया दिलेली नाही.
10 / 10
अमेरिकेची मॉडर्ना कंपनी आणि ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या कोरोना लशीलासुद्धा प्राथमिक चाचणीत यश मिळाले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या