Corona Booster Dose: देशवासियांनो! सर्वांनी बुस्टर डोससाठी तयार रहावे; कोरोना लाटेमुळे केंद्र सरकार करतेय तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 09:21 IST
1 / 8चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपच्या देशांमध्ये कोरोना व्हायरस आक्राळ विक्राळ रुप धारण करू लागला आहे. यामुळे केंद्र सरकारने मोठ्या हालचाली सुरु केल्या असून बुस्टर डोस देण्यासाठी नियोजन सुरु केले आहे. सध्या आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस दिला जात आहे. 2 / 8काही देशांमध्ये ओमायक्रानच्या प्रकोपामुळे १८ वर्षांवरील लोकांना बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. काही देशांत तर चौथा बुस्टर डोस दिला जात आहे. मोदी सरकार देखील देशातील १८ वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस देण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बुस्टर डोसची मोहिम टप्प्याटप्प्याने सुरु करावी की सरसकट १८ वर्षांवरील नागरिकांना सुरु करावी, यावर विचार केला जात आहे. 3 / 8एका अधिकाऱ्याने सांगितले की, की वयाची पात्रतेसह सरकार अनेक गोष्टींवर विचार करत आहे. कोरोना लसीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन कसे केले जाईल, वेळेवर कसा पुरवठा होईल, किती लवकर बुस्टर डोस उपलब्ध होईल आदी गोष्टी तपासल्या जात आहेत. सरकार देशभरात बुस्टर डोस देणे सुरु ठेवणार आहे. सध्यातरी हा डोस रिटेल मार्केटमध्ये उपलब्ध करणार नाही. 4 / 8आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी देखील बुस्टर डोसची गरज लागू शकते. कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्यांना जशी परवानगी होती, तशीच आता बुस्टर डोस मिळालेल्यांनाचा प्रवास करता येण्याची शक्यता आहे. यामुळे देखील केंद्र बुस्टर डोसवर विचार करत आहे. 5 / 8देशात कोरोना लसीकरण मोहिमेची सुरुवात १६ जानेवारी, २०२१ पासून झाली होती. तर वर्षानंतर १६ मार्चपासून १२ ते १४ वर्षांच्या मुलांना कोरोना लस दिली जात आहे. 6 / 8अमेरिकेतील वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी इशारा दिला आहे की कोविड-19 च्या ओमिक्रॉन प्रकारातील अधिक संसर्गजन्य उप-प्रकार BA.2 लवकरच अमेरिकेत कोरोना विषाणूचे रुग्ण वाढवू शकतो.7 / 8दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 12 वर्षांखालील मुलांसाठी अँटी-कोरोना व्हायरस संसर्ग लसीकरणाबाबत स्टेटस रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने तीन आठवड्यांत स्टेटस रिपोर्ट सादर करावा, असे सांगितले.8 / 8एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 12-17 वयोगटातील मुलांचे त्वरित लसीकरण करण्याचे निर्देश देण्याच्या विनंतीचीही न्यायालयाने दखल घेतली. संसर्गाची तिसरी लाट त्यांच्यावर अधिक परिणाम करू शकते, असे सांगण्यात आले आहे.