शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : सावधान! लसीचे 2 डोस घेतलेल्यांवर कोरोना करतोय अटॅक; अँटीबॉडीबाबत समोर आली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 11:44 IST

1 / 12
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. संशोधनातून कोरोनाबाबत सातत्याने धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे.
2 / 12
देशभरातील कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना कोरोना विळखा घालत असल्याचं आता समोर आलं आहे. कारण त्यांच्यातील अँटीबॉडीज संपू होऊ लागल्या आहेत. तसेच अद्याप ज्यांनी डोस घेतला नाही त्यांना जास्त धोका आहे.
3 / 12
कोरोना लस घेऊनही अनेकांना संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. डॉक्टरांनी ज्यांनी बूस्टर डोस मिळाला आहे व्हायरसची लागण झाली नसल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य विभागाने शनिवारपर्यंत आलेल्या एकूण 72 रुग्णांचा अहवाल तयार करून तो सीएमओकडे पाठवला आहे.
4 / 12
हे स्पष्ट झाले की 54 पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये प्रत्येकाला कोविशील्ड किंवा कोवॅक्सीनचे दोन डोस मिळाला होते परंतु तरी त्यांना संसर्ग झाला होता. या 54 पैकी फक्त दोघांना ओमायक्रॉनच्या लाटेमध्ये लागण झाली होती. या बाधितांना दोन डोस देऊन 9 महिने झाले, तरीही ते कोरोनाच्या विळख्यात आले.
5 / 12
डॉक्टरांचा असा दावा आहे की जे बूस्टर डोस घेतात त्यांना कमी धोका आहे. आतापर्यंत, बूस्टरनंतर संसर्ग झाल्याचे एकही प्रकरण उघडकीस आलेले नाही, तर बूस्टर घेणारे लोक अनेक दिवस संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहिले. दोन डोस घेणारे सात प्रकरणे देखील ओळखली गेली आहेत परंतु त्यांच्या नातेवाईकांनी आधीच बूस्टर घेतले होते.
6 / 12
एसीएमओ डॉ. आर.पी. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी कोरोनाने दोन डोस घेतलेल्यांना देखील विळखा घातला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
7 / 12
काही दिवसांपासून दिल्ली आणि मुंबईसह देशाच्या विविध भागात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, तज्ज्ञाचा अंदाज समोर आला असून तो धक्कादायक आहे. यानुसार, मे महिन्याच्या मध्यात कोरोना भारतात आपल्या शिखरावर असेल. याशिवाय दररोज 50 हजारांहून अधिक केसेस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
8 / 12
हे भाकीत इतर कोणी नसून आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणिंद्र अग्रवाल यांनी केले आहे, ज्यांनी गेल्या तीन वर्षांपासून अचूक आकडेवारी दिली आहे. प्रोफेसर मणिंद्र गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोनाचे भाकीत करतात. प्रोफेसर अग्रवाल यांनी आज तकशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.
9 / 12
प्रोफेसर मणिंद्र यांनी गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या आधारे अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या आधारे त्यांनी मे महिन्यात भारतात कोरोनाचा कहर होण्याची भीती व्यक्त केली आहे. अंदाजानुसार या काळात दररोज 50 ते 60 हजार केसेस येऊ शकतात.
10 / 12
देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये एवढी मोठी वाढ होण्याचे कारण काय असेल? प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनीही याचे कारण सांगितले आहे. त्यांच्या मते, लोकांमधील नॅचरल इम्युनिटी कमी होणे हे यामागील कारण आहे.
11 / 12
वास्तविक, जेव्हा संसर्ग होतो तेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पण आता लोकांच्या शरीरातील ही क्षमता पाच टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याच वेळी, नवीन कोरोना प्रकार देखील पूर्वीपेक्षा वेगाने पसरत आहे. ही दोन कारणे कोरोनाच्या वाढत्या वाढीमागील प्रमुख कारणे आहेत.
12 / 12
कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची बाब चिंताजनक आहे, तर दुसरीकडे दिलासा देणारी बाबही आहे. प्रोफेसर अग्रवाल यांच्या मते याबाबत फार काळजी करण्याची गरज नाही. कोरोनाची प्रकरणे खूप वाढू शकतात, परंतु लोकांसाठी ते फारसे घातक ठरणार नाही. याशिवाय मृत्यूची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही कमी राहील.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस