नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
म्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 20:52 IST
1 / 7पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो काश्मीरमध्ये, असं म्हटलं जातं. पण भौगोलिक स्थान, राजकीय अस्थिरतेमुळे काश्मीरमध्ये भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळे असे कायदे लागू करण्यात आलेले आहेत. 2 / 7काश्मीरमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला जमीन खरेदी करता येत नाही. तसेच काश्मीरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या राज्याची राजधानी दर सहा महिन्यांनी बदलते. 3 / 7येथील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानामुळे काश्मीरची राजधानी दर सहा महिन्यांनी बदलली जाते. 4 / 7हिवाळ्यात काश्मीरची राजधानी सहा महिन्यांसाठी श्रीनगरहून जम्मू येथे हलवली जाते. तर उन्हाळ्याच्या दिवसात उर्वरित सहा महिने काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे असते. 5 / 7काश्मीरमध्ये या प्रक्रियेला दरबार मुव्ह असे म्हणतात. ही प्रक्रिया ब्रिटिश काळापासून सुरू आहे, मात्र ती अद्याप बदलण्यात आलेली नाही. 6 / 7राजधानी बदलण्याची प्रथा 1862 रोजी डोग्रा शासक गुलाब सिंह यांनी सुरू केली होती. गुलाब सिंह हे महाराज हरिसिंह यांचे वंशज होते. 7 / 7राजधानी श्रीनगरहून जम्मूला हलवण्याची प्रक्रिया खर्चिक असल्याने तिला विरोधही होत आहे.