By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:19 IST
1 / 6वाचनसंस्कृती लयाला जाते आहे, अशी ओरड कायम होताना दिसते. प्रत्यक्षात स्मार्टफोन्सच्या वलयात अडकलेल्या लहानग्यांना पुस्तकापर्यंत नेण्यासाठी काय प्रयत्न केले जातात, याचे उत्तर देणे कठीण आहे. मात्र असाच काहीसा आगळावेगळा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात केला आहे. 2 / 6लंडन येथील ‘न्यूड्स’ या वास्तुविशारद संस्थेचे संस्थापक नुरू करीम यांच्या संकल्पनेनुसार वस्तुसंग्रहालयाच्या आवारात प्रियश्री आर्ट गॅलरीच्या सहयोगाने ‘बुक वॉर्म : पॅविलियन’ कलाकृती साकारण्यात आली आहे. 3 / 6प्लायवूडपासून साकारण्यात आलेली ही कलाकृती सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ही कलाकृती म्हणजे खुले वाचनालय असून, यात जवळपास हजारोंनी पुस्तकांचा खजिना आहे. 4 / 6या कलाकृतीच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार, युवा-बालपिढीला वाचन संस्कृतीशी जोडून घेण्यासाठी संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 5 / 6या ठिकाणी वाचत बसण्यासाठी, पुस्तके चाळण्यासाठी, गोष्टी सांगण्यासाठी मोकळी जागा आहे. 120 फूट लांबीचा आणि 40 फूट विस्तारित जागेत हा पुस्तकी किडा साकारण्यात आला आहे. 6 / 6वस्तुसंग्रहालयात भेट देणाऱ्या विद्यार्थी, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी ही कलाकृती आकर्षण ठरत आहे. डिसेंबर महिना अखेरपर्यंत ही कलाकृती कलारसिकांना पाहायला मिळणार आहे.