बंगळुरुतील बारमध्ये भीषण आग, ५ जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 15:18 IST
1 / 6बंगळुरुमध्ये बारला लागलेल्या आगीत पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री अकराच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आली आहे2 / 6आत झोपलेल्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. बंगळुरुतील भाजी मंडतील कुंभारा सांघा बिल्डिंगमधील तळघरामध्ये असेलेल्या कैलास बार आणि रेस्टॉरन्टला आग लागली होती3 / 6पहाटे 2: 30 वाजता ही दुर्देवी ही घटना घडली. होरपळून मृत्यू झालेले हे सर्व कर्मचारी हॉटेल बंद झाल्यानंतर तिथेच झोपले होते.4 / 6अचानक आग लागल्याने त्यांना बचावाची कुठलीच संधी मिळाली नाही. यात या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही5 / 6रात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर तातकाळ घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या गाड्या आणि बंब दाखल झाले. पहाटे पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तोपर्यंत आत झोपलेल्या पाच जणांचा या अग्नितांडवामध्ये मृत्यू झाला6 / 6ही आग नेमकी कशामुळं लागली हे अद्याप समजू शकले नाही. ज्यावेळी रेस्टॉरन्टला आग लागली त्यावेळी काही कर्मचारी आतमध्ये झोपले होते. आग लागल्यानंतर ते रेस्टॉरन्टमध्ये अडकले गेले. आगीच्या धुरामध्ये घुसमटून त्यांचा जागीच मृत्यू झाला