विमानतळ की बाग! तब्बल 5000 कोटींचा खर्च; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 13:40 IST
1 / 8 बंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 11 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथील केम्पेगौडा विमानतळाच्या नव्याने बांधलेल्या टर्मिनल-2 (Kempegowda Airport Terminal-2) चे उद्घाटन करणार आहेत. 2 / 8 सुमारे 5,000 कोटी रुपये खर्चून हे टर्मिनल-2 तयार करण्यात आले आहे. या नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांना खूप चांगल्या सुविधा मिळतील. तसेच, विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता तसेच चेक-इन आणि इमिग्रेशनसाठी काउंटरही दुप्पट होणार आहेत.3 / 8 108 फुटी पुतळ्याचे अनावरण- केम्पेगौडा विमानतळाची (Kempegowda Airport) प्रवासी हाताळणी क्षमता सध्या वार्षिक 2.5 कोटी आहे, जी टर्मिनल-2 मुळे सुमारे 5-6 कोटींपर्यंत वाढेल. 4 / 8 या टर्मिनलसोबतच पंतप्रधान मोदी या आंतरराष्ट्रीय विमानतळ संकुलात स्थापित केल्या जाणाऱ्या बंगळुरूचे संस्थापक केम्पेगौडा यांच्या 108 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरणही करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.5 / 8 बंगळुरू विमानतळाने आधीच संपूर्ण कॅम्पसमध्ये अक्षय ऊर्जेचा (Renewable Energy) 100% वापर करून एक बेंचमार्क सेट केला आहे. या नव्याने बांधलेल्या टर्मिनल-2 ची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 6 / 8 हे टर्मिनल अतिशय आकर्षक दिसत असून, यात झुलती बाग, हिरवेगार गवत आणि फुलांनी सजलेल्या भिंती बसवण्यात आल्या आहेत. या झाडांमुळे परिसरातील वातावरण अतिशय प्रसन्न होणार आहे.7 / 8 बागेत फिरल्यासारखे वाटेल- केम्पेगौडा विमानतळाचे टर्मिनल 2 हे बंगळुरूचे गार्डन सिटी म्हणून डिझाइन केले आहे. या टर्मिनलला भेट देणाऱ्या प्रवाशांना बागेत फिरल्यासारखे वाटेल. 8 / 8 येथे, 10,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या हिरव्यागार भिंती, हँगिंग गार्डन असेल. म्हणजेच, प्रवासी अतिशय प्रसन्नमय वातावरणातून एअरपोर्टबाहेर पडतील. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ही उद्याने भारतात तयार करण्यात आली आहेत.