सलाम ! अवनी चतुर्वेदी ठरली लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 13:50 IST
1 / 5भारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने MiG-21 लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. यासोबतच अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे. 2 / 519 फेब्रुवारीला सकाळी अवनी चतुर्वेदीने गुजरातमधील जामनगर एअरबेसवरुन उड्डाण घेतलं आणि यशस्वीपणे मिशन पूर्ण केलं. 3 / 5अवनीचं शालेय शिक्षण मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यातील एका छोट्या गावात देऊलंद येथे झालं आहे. 2014 मध्ये तिने राजस्थानच्या बनस्थली विद्यापीठातून पदवी घेतली. यानंतर तिने भारतीय हवाई दलाची परिक्षा उत्तीर्ण केली. 4 / 5अवनी चतुर्वेदीचा जन्म 27 ऑक्टोबर 1993 रोजी झाला आहे. तिचे वडिल दिनकर चतुर्वेदी हे मध्य प्रदेश सरकारमध्ये जलसंवर्धन विभागात कार्यकारी अभियंता आहेत, तर तिची आई गृहिणी आहे. 5 / 5महिला लढाऊ वैमानिक बनवण्यासाठी 2016 मध्ये पहिल्यांदाच तीन महिला अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना यांना हवाई दलात कमिशन केलं होतं.