Family: तुम्हालाही नातेवाईक त्रास देतात? हे ५ उपाय करा आणि अशा मंडळींपासून सुटका मिळवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 14:34 IST
1 / 6कुटुंबामध्ये कुठल्याही एखाद्या नातेवाईकासोबत वादविवाद, मदभेद होणं ही सामान्य बाब आहे. मात्र काही नातेवाईक हे खुपच किरकिरे आणि त्रासदायक असतात. बऱ्याचदा इच्छा नसताना त्यांच्याशी आमना-सामना होतो. अशा नातेवाईकांना कसं टाळायचं, याचे पाच उपाय आम्ही तुम्हाल सांगणार आहोत. 2 / 6आपण काय करायला तयार आहोत आणि काय करायला तयार नाही आहोत, याबाबत स्पष्ट आणि दृढ राहा. आपल्या मर्यादांबाबत विनम्र पण दृढ पद्धतीने बोला. 3 / 6 त्रासदायक नातेवाईकांसोबत संघर्ष टाळणे हे नेहमीच चांगल असतं. विशेषकरून कौटुंबिक कार्यक्रम वगैरे असतील तर अशा वेळी थोडा ब्रेक घ्या. कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत वेळ घालवा किंवा स्वत:ला या स्थितीपासून बाहेक काढा. 4 / 6अशा परिस्थितीत स्वत:ला शांत ठेवा. तसेच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. राग किंवा नैराश्यासोबत प्रतिक्रिया दिल्याने स्थिती नेहमीच बिघडण्याची शक्यता असते. 5 / 6कधी-कधी काही लोक स्वत:च्या जीवनात संघर्घ करत असल्याने इतरांसमोर अडचणी निर्माण करण्याचं काम करतात. तेव्हा तुम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. 6 / 6अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य किंवा डॉक्टरांकडूनही सल्ला घेऊ शकता. तुम्ही कशा पद्धतीने या समस्येचा सामना करू शकता, हे तुम्हाला सांगण्यासाठी ते सक्षम असतीत.