कच्च्या तेलाची किंमत १ डॉलरपेक्षा खाली गेली खरी; पण भारताला फायदा काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 11:28 IST
1 / 10गेल्या साडे तीन दशकांमध्ये जे जमले नाही ते दीड महिन्यात कोरोनाने करून दाखवले आहे. कच्च्या तेलाची किंमत चक्क ० म्हणजेच शून्य डॉलरच्या खाली गेली आहे. अमेरिकी क्रूड ऑईलच्या (WTI) किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. 2 / 10अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मागणी घटल्याने कच्च्या तेलाची किंमत सोमवारी -३.७० डॉलरवर गेली आहे. भारताला याचा फायदा काय असा प्रश्न पडला असेल. तर भारत हा ब्रेंट क्रूडवर अवलंबून आहे नाही WTI च्या अमेरिकी क्रूडवर. 3 / 10ब्रेंट क्रूडची किंमत आजही २० डॉलरच्या वर आहे. यामुळे अमेरिकी तेलाच्या किंमतीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, कच्च्या तेलाच्या घसरत्या किंमतीचा परिणाम भारतावर कसा होतो हे पाहणे गरजेचे आहे. 4 / 10भारतात कच्च्या तेलाची मोठी आयात केली जाते. एकूण मागणीच्या ८५ टक्के तेल हे आखाती देशांकडून आयात केले जाते. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या तर त्याचा फायदा भारताला होतो. 5 / 10तेल जेव्हा स्वस्त होते, तेव्हा आयात कमी केली जात नाही. तर भारताकडे परकीय गंगाजळी वाचते आणि रक्कम कमी लागते. यामुळे रुपयाला त्याचा फायदा होतो. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होतो आणि महागाईही नियंत्रणात येते. यामुळे जेव्हा बाहेरील बाजारात किंमत कमी असल्यास त्याचा भारतीय बाजारावरही परिणाम होऊन तेलाच्या किंमती कमी होतात. 6 / 10कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये जेव्हा १ डॉलरची घसरण होते तेव्हा आयातीसाठी भारताला २९००० कोटी डॉलर कमी मोजावे लागतात. म्हणजेच जर १० डॉलर कमी झाले तर तब्बल २ लाख ९० हजार डॉलरची बचत होते. यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवरही याचा परिणाम होतो.7 / 10जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती घसरतात तेव्हा पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतींमध्येही घसरण होते. यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ शकतात. 8 / 10कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये १ डॉलरची घट झाली तर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये ५० पैशांची घट होते. त्या उलट जर कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाली तर डॉलरमागे ५० पैसे किंमत वाढते. 9 / 10लॉकडाऊन असल्याने बहुतांश जणांना पेट्रोल, डिझेलचे आजचे दर माहिती नसतील. गेल्या महिनाभरापासून कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये कमालीची घसरण झाली असून प्रती बॅरल दर २० ड़ॉलरवर आला आहे. 10 / 10मात्र, गेल्या महिना भरापासून एका पैशानेही पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आलेली नाही. उलट महाराष्ट्र सरकारने १ एप्रिलपासून कर वाढविल्याने १ रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ७६.३१रुपये तर डिझेल ६६.२१ रुपयांवर आहे.