By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:39 IST
1 / 7अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, याचा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या १२ वी शिकत असलेल्या तरुणाने चांगलीच धास्ती घेतली आहे. या विमान अपघातात आतापर्यंत २७५ मृत्यू झाले आहेत. या विमान अपघातामागे घातपात होता का, याची चौकशी तपास यंत्रणा करत आहेत. यामुळे हा व्हिडीओ नेमका त्याचवेळी कसा काढला यावरही पोलिसांना संशय होता, यामुळे हा व्हिडीओ काढणाऱ्या १७ वर्षांच्या तरुणाची पोलिसांनी आज चौकशी केली.2 / 7आर्यन हा आपल्या नातेवाईकांकडे आला होता. त्याने यापूर्वी एवढ्या जवळून कधीच विमान पाहिलेले नव्हते. ज्या मेघानीनगरमध्ये विमान कोसळले त्या भागात त्याचे नातेवाईक राहतात. त्याने आपल्या मित्रांना दाखविण्याच्या उद्देशाने या विमानाचा व्हिडीओ काढला होता. यावेळी त्याला ते विमान पुढे जाऊन कोसळले याची काहीच कल्पना नव्हती. परंतू, त्याला पोलीस चौकशीला सामोरे जावे लागले आहे.3 / 7आर्यनने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपण खूप घाबरलो असल्याचे म्हटले आहे, तसेच आयुष्यात कधीच विमानात बसणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. आर्यनने त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ १.३९ वाजता रेकॉर्ड केला होता. त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओची हीच वेळ दिसत आहे. 4 / 7विमान अपघात झाल्यावर आर्यनने सर्वात पहिले त्याच्या वडिलांना व्हिडीओ पाठविला. त्यांनी तो व्हिडीओ दुसऱ्या कोणाला तरी पाठवला असावा, असे सांगितले जात आहे.5 / 7आर्यन पहिल्यांदाच शहरात आला होता, तो गावी असतो असे त्याच्या बहिणीने सांगितले. एवढ्या खालून विमान जाताना पाहून त्याने त्याचा व्हिडीओ काढला. त्याच्या शहरातील घरावरून विमाने उडत असल्याचे त्याला गावातील त्याच्या मित्रांना सांगायचे होते. त्यानेही कधी एवढ्या जवळून विमान पाहिलेले नव्हते, असे त्याच्या बहीणीने सांगितले. 6 / 7या व्हिडीओची स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. पोलिसांनी या घटनेचा व्हिडीओ बनविला म्हणून कोणाला अटक केली नसल्याचे सांगितले आहे. व्हिडीओ बनविणाऱ्या तरुणाने या व्हिडीओची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याला आम्ही एक साक्षीदार म्हणून त्याच्या वडिलांसोबत बोलविले होते. चौकशी करून त्याला परत पाठविले आहे, असे पोलिसांनी सांगितले. 7 / 7या भागातील अन्य काही लोकांनीही हे विमान खाली येताना आणि आदळताना पाहिले आहे. यामुळे या लोकांचीही जशी माहिती मिळत आहे तशी चौकशी केली जात आहे. परंतू, तांत्रिकदृष्ट्या आर्यन हा महत्वाचा साक्षीदार असल्याचे पोलिसांनी सांगितले.