शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महागाईमुळे अमेरिका सोडून भारतात स्थायिक झाला तरुण, म्हणतो, इथे सर्व ८० टक्के स्वस्त

By बाळकृष्ण परब | Updated: March 23, 2025 09:00 IST

1 / 6
सतत वाढत जाणारी महागाई हा आपल्या देशातील सर्वसामान्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरत आला आहे. सरकारी पातळीवर अनेक उपाय केले तरी ही महागाई काही कमी होण्याचं नाव घेत नाही. मात्र एक अमेरिकन तरुण तिथल्या महागाईला वैतागून चक्क भारतात स्थायिक झाल्याची माहिती समोर आली आहे.
2 / 6
इलियट रोझेनबर्ग असं या अमेरिकन तरुणाचं नाव असून, तो अमेरिकेतील प्रचंड महागाईला कंटाळून भारतात स्थायिक झाला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून तो गोव्यामध्ये राहत असून, त्याने येथील जीवनमानाबाबतचा आपला अनुभव लिंक्डइनवर शेअर केला आहे.
3 / 6
अमेरिकेतील महागाई आपल्या जीवनशैलीला प्रभावित करत असल्याने १२ वर्षांपूर्वी मी पदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ब्राझील आणि आशिया खंडातील विविध देशांमध्ये फिरल्यानंतर अखेरीस मी गोव्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, असं त्यानं सांगितलं.
4 / 6
अमेरिकेच्या तुलनेत गोव्यामध्ये जीवन जगणं खूपच स्वस्त असल्याचं त्याने सांगितलं. गोव्यामध्ये मी एक लाख रुपयांहून कमी खर्चात आरामदायी जीवन जगतो. अमेरिकेच्या तुलनेत इथे सुमारे ८० टक्के कमी खर्च येतो, असेही त्याने सांगितले.
5 / 6
एवढंच नाही तर गोव्यामधील वास्तव्यादरम्यान त्याने एका भारतीय तरुणीसोबत विवाह देखील केला. तो हिंदी भाषाही शिकला. तसेच दोन नवे व्यवसायही सुरू केले.
6 / 6
दरम्यान, रोझेनबर्गने लिहिलेली पोस्ट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, युझर्सकडून त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. निरोगी आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी भारत भारत हा खूप चांगला देश असल्याचं ऐकून खूप बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया एका युझरने व्यक्त केली आहे.
टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाInflationमहागाई