शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:02 IST

1 / 5
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सोमवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन झालं.
2 / 5
माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे माऊलीच्या पालखीच्या आगमनासाठी भक्तांचा मेळा जमला होता.
3 / 5
पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरी नामाच्या गजरात आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.
4 / 5
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.
5 / 5
धर्मपुरी येथील स्वागतानंतर माऊलीचा पालखी सोहळा कारुंडे हद्दीत विसाव्यासाठी थांबला असून माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर