शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरातल्या जिलेबिच्या प्रथेची कथा

By admin | Updated: January 26, 2016 00:00 IST

1 / 7
भारतीय वंशशास्त्रचे अभ्यासक पी. के. गोडे यांनी 1943 मध्ये लिहिलेल्या न्यू इंडियन अॅटीक्युरी या पुस्तकात जिलेबीची रेसिपी असल्याचे नोंदविले आहे. 1450 मध्ये लिहिलेल्या प्रियामकर्णरपकवा या जैन ग्रंथात तसेच 17व्या शतकातील रघुनाथ यांनी लिहिलेल्या भोजन कुटहला या ग्रंथातही जिलेबीचा संदर्भ आहे.
2 / 7
देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी क्रांतीवीरांच्या साता-यातील कृष्णा सीताराम राऊत यांनी त्यांना झालेला आनंद स्वत:पुरता ठेवला नाही. त्यांनी तब्बल 11 किलो जिलेबी सातारभर वाटली आणि हा आनंद साजरा केला. आजही ही परंपरा सातारकरांनी जपून ठेवली आहे.
3 / 7
सादीक पंजाबी आणि गामा पंजाबी या पाकिस्तानी मल्लातील कुस्तीवेळी त्यांनी चोपदार हॉटेलमध्ये जिलेबी खाल्याची आठवण श्रीकांत चोपदार सांगतात. माळकर चोपदार यांच्याशिवाय पूर्वी उरुणकर खत्री ढिसाळ विजय भुवन सुखसागर मिलन आहार येथे जिलेबी मिळत असे.
4 / 7
राजाराम महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळय़ातही माळकरांकडून आणलेली जिलेबी वाटण्यात आल्याचे संदर्भ सापडले आहेत. राजघराण्यातही माळकर यांच्याकडून किती शेर जिलेबी आणली याचे कागद सापडले आहेत.
5 / 7
कुस्तीशौकिन रामचंद्र बाबाजी माळकर यांनी सर्वप्रथम मल्लांनी कुस्ती मारली की त्यांचे तोंड गोड करण्यासाठी 88 वर्षापूर्वी जिलेबी वाटण्याची प्रथा सुरु केली ती आजही कायम आहे.
6 / 7
कोल्हापुरकर सण असो वा नसो रोज सहा हजार किलो जिलेबी फस्त करतात. स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाला तर हा आकडा 90 हजार किलोच्या घरात जातो.
7 / 7
स्वातंत्र्यदिन असो की प्रजासत्ताक दिन जिलेबी खाण्याचीही एक आगळीवेगळी परंपरा कोल्हापूरने जपलेली आहे. कोल्हापुरात चौकाचौकात जिलेबीचे स्टॉल्स लागलेले असतात. मोजायचेच झाले तर त्यांची संख्या हजारावर जाते. पावशेर का होईना जिलेबी घरात येतेच येते. ही प्रथा सांगणारी ही फोटोस्टोरी (सर्व छायाचित्रे - आदित्य वेल्हाळ)