1 / 5एक्सप्रेस वेवरील दरड हटवण्याचे काम आज रात्री उशीरापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून प्रवाशांनी जुन्या मुंबई - पुणे महामार्ग व अन्य पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 2 / 5मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्याची यंदाची ही दुसरी घटना देशभरात कौतुकाचा विषय ठरलेल्या या एक्सप्रेस वेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 3 / 5एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्याने मुंबई व पुणे अशा दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या होत्या. 4 / 5आडोशी बोगद्याजवळ गाडीवर दरड कोसळल्याने दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर तीन महिला प्रवासी या अपघातात जखमी झाल्या आहेत. 5 / 5मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर रविवारी सकाळी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने एक्सप्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.