1 / 9ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला कॅलेंडर गर्ल्स या हिंदी चित्रपटाच्या टीमने हजेरी लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. 2 / 9मुंबईतील शिवसेनेच्या एका पदाधिका-याने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना पारितोषिक म्हणून चक्क कांदे देण्यात आले. 3 / 9सात आठ थर रचणा-या गोविंदा पथकांची चित्तथरारक क्षण कॅमे-यात कैद करताना लोकांची झुंबड उडाली होती.4 / 9घाटकोपरमध्ये भाजपा खासदार किरीट सोमय्या व आमदार राम कदम यांनीदेखील हंडी फोडून दहीहंडी साजरी केली. 5 / 9पडणार पण हार मानणार नाही..... थर कोसळल्यानंतरही गोविंदा पथकांनी आत्मविश्वास कमी झाला नव्हता. अपयश आल्यावरही पुन्हा ताकदीने उभं राहण्याचा संदेशच या गोविंदा पथकांनी दिला. 6 / 9दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्याचा अयशस्वी प्रयत्न. 7 / 9दहीहंडी फोडताना गोविंदा पथक...8 / 9एकीचे बळ..... थर रचण्याची तयारी करताना मुंबईतील गोविंदा पथक 9 / 9गोविंदा आला रे असं म्हणत थरावर थर रचणारी गोविंदा पथकं डिजेवर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. दहीहंडी उत्सवाची ही झलक...