By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:04 IST
1 / 13शिवसेनेचे मातब्बर नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आहे. त्यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून संपूर्ण राजकारण ढवळून निघाली आहे. शिवसेनेतील जवळपास ४० आमदार त्यांच्या बंडात सहभागी झाले आहेत. एवढेच नाही, तर काही अपक्ष आमदारांचाही त्यांना पाठींबा आहे. एकनाथ शिंदे हे कधी काळी ठाण्यात रिक्षा चालवायचे. अशा एकनाथ शिंदे यांच्या संपतीसंदर्भात आपल्याला माहीत आहे का? आता ते करोडपती आहेत... 2 / 13एकनाथ शिंदे कधी काळी ठाण्यात रिक्षा चालवायचे. भाड्याची रिक्षा चालवून पोट भरायचे. त्याच काळात एकनाथ शिंदे शिवसेनेकडे आकर्षित झाले. आनंद दिघे यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि शिंदेंचे नशीबच पालटले.3 / 13रिक्षावाला ते शाखाप्रमुख, शाखाप्रमुख ते नगरसेवक, नगरसेवक ते गटनेता, गटनेता ते आमदार, मग राज्यात कॅबिनेट मंत्री आणि मुलगा खासदार, असा शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. कधी काळी रिक्षा चालवणारे शिंदे आता करोडपती आहेत, कोट्यधीश आहेत.4 / 13एकनाथ शिंदे यांनी 2019 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, 2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, शिंदेच्या नावावर एकूण दोन घरं आहेत. 5 / 13शिंदेची घरं - शिंदे यांची धोतरे चाळ वागळे इस्टेट इथे एक रूम आहे. जिचे क्षेत्रफळ 360 स्क्वेअर फूट आहे. तर ठाण्याच्या लुईसवाडीतील लँडमार्क सोसायटीत एक मोठा फ्लॅट आहे. ज्याचे क्षेत्रफळ 2370 स्क्वेअर फूट एवढे आहे. 6 / 13शिंदे यांच्या पत्नीच्या नावारव जी घरं आहेत त्यांत शिवशक्ती भवन येथील एक फ्लॅट आहे. ज्याचे क्षेत्रपळ १०९० स्क्वेअर फूट एवढे आहे. तर ठाण्याच्या लुईसवाडीत लँडमार्क सोसायटीतच त्यांच्या पत्नीच्या नावावरही एक फ्लॅट आहे. त्याचे क्षेत्रपळ 2370 स्क्वेअर फूट एवढे आहे. 7 / 13शिंदे यांच्या या घरे आणि गाळ्यांचा 2019 चा बाजार भाव हा ९ कोटी ४५ लाख रुपये एवढा आहे. यात 2022 च्या बाजार भावानूसार, नक्कीच वाढ झालेला असू शकतो.8 / 13एकनाथ शिंदेंकडे किती शेत जमीन? - एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावार एकूण 28 लाख रुपयांची शेत जमीन आहे. दरेगाव महाबळेश्वर येथे त्यांची पाच हेक्टर जमी आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर चिखलगाव ठाणे येथे १.२६ हेक्टर जमी आहे. 9 / 132019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, शिंदेंकडे एकूण 7 गाड्या होत्या, यात दोन स्कॉर्पिओ एक बलेरो, दोन इनोव्हा, एक अरमाडा आणि एक टेम्पो. या गाड्यांची एकूण किंमत जवळपास 46 लाख रुपये एवढी होते.10 / 13शिंदेंकडे किती सोनं? - 2019च्या प्रतिज्ञापत्रानुसार शिंदेंकडे एकूण 110 ग्रॅम सोनं आहे. याची किंमत 4 लाख 12 हजार रुपये एवढी आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 580 ग्रॅम सोनं आहे. शिंदेंकडे असलेल्या सोन्याची एकूण किंमत 25 लाख 87 हजार रुपये एवढी आहे. अर्थात ही किंमत 2019 ची आहे. 2022 नुसार त्यात वाढ झालेली असू शकते.11 / 13एवढी आहे शिंदेंची गुंतवणूक - शिंदेंची शिवम ट्रान्सपोर्टमध्ये 3 लाखांची गुंतवणूक, बॉम्बे फूट पॅक्समध्ये 8 लाखांची गुंतवणूक, शिवम एन्टरप्रयजेसमध्ये 11 लाख रुपयांची गुंतवणूक, तर पत्नीच्या नावावर एक गाळा 30 लाख रुपये.12 / 13शिंदेंवर कोट्यवधींचे कर्ज - एकनाथ शिंदेंवर TJSB बँकेचे एकूण 2 कोटी 61 लाख रुपयांचे गृह कर्ज आहे. तर श्रीमान रिअॅल्टीचे 98 लाख रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय शिंदेंकडे 2 रिव्हॉल्वर आणि एका पिस्तुलाचा परवाना आहे.13 / 132019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात शिंदेंनी या संपूर्ण संपत्तीची माहिती दिली आहे. येथे सांगितलेल्या जमीन, फ्लॅट आणि सोने आदिंच्या किमती बाजारभावाप्रमाणे आहेत. यात आता नक्कीच वाढ झालेली असणार आहे.