शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Eknath Shinde Vs Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी आखलेल्या मार्गानेच जाणार एकनाथ शिंदे; महाराष्ट्र दौऱ्यात शिवसेना ताब्यात घेण्याचा 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 12:26 PM

1 / 9
महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून शिवसेनेतील वादळाने राजकारण ढवळून निघाले आहे. बंडखोर एकनाथ शिंदे भाजपाच्या साथीने मुख्यमंत्री झाले खरे पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार काही झालेला नाही. त्यातच शिंदे गेल्या तीन चार दिवसांपासून दिल्लीतील भाजपा नेत्यांची भेट मागत आहेत, परंतू त्यांना काही बोलावणे आलेले नाही. अशातच शिंदे उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत.
2 / 9
शिवसेनेला ताकद देण्यासाठी आदित्य ठाकरे यात्रा करत आहेत. यामध्ये ते एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना आणि खासदारांना लक्ष्य करत आहेत. पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरेंनी ज्या जिल्ह्यांना भेटी दिल्या त्याच जिल्ह्यांच्या दौऱ्यावर शिंदे जाणार आहेत.
3 / 9
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची सत्ता घालविल्यानंतर शिंदे हे शिवसेनेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे देखील धाव घेतली आहे. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिका पेडिंग असल्याने त्यास स्थगिती आली आहे.
4 / 9
आदित्य ठाकरे यांनी आपल्या यात्रेचा पहिला टप्पा भिवंडीतून सुरू केला आणि शिर्डीत संपविला. नाशिक, अहमदनगर, औरंगाबादसह काही जिल्ह्यातून ही यात्रा गेली. यावेळी आदित्य ठाकरे हे शिंदे गटावर आक्रमक झाले होते. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले.
5 / 9
यामुळे आता एकनाथ शिंदे देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यामध्ये ते या तीन जिल्ह्यांतूनच दौरा सुरु करतील. शिंदे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह आपल्या गटाच्या आमदारांची देखील भेट घेणार आहेत.
6 / 9
आदित्य ठाकरेंनी यात्रेतून बंडखोरांविरोधात जे वातावरण तयार केलेले ते बदलण्यासाठी शिंदे गटाने हा दौरा सुरु केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
7 / 9
शिंदे आपल्या दौऱ्याची सुरुवात मालेगाव येथून करणार आहेत. मालेगाव हा शिवसेनेचे बंडखोर आमदार दादाजी भुसे यांचा मतदारसंघ आहे. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. यानंतर ते औरंगाबादला रवाना होतील. यावेळी ते आमदार सुहास कांदे यांचीही भेट घेणार आहेत.
8 / 9
शिंदे वैजापूर येथे सभा घेतील. यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते डखोर आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडला जातील. औरंगाबाद मध्य विभागाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयाला भेट देतील. यानंतर औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे यांचीही भेट घेणार आहेत.
9 / 9
भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयाला भेट देऊन एकनाथ शिंदे मुंबईला रवाना होणार आहेत. याचवेळी ३१ जुलैपासून आदित्या ठाकरे यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार आहेत. हा दौरा सावंतवाडीतून सुरु होईल आणि कोल्हापूरपर्यंत असेल.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना