शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: March 4, 2016 00:00 IST

1 / 6
उष्णतेचा कडाका वाढत असतानाच कोसळलेल्या या पावसामुळे राज्यातील नागरिकांना थोडा थंडावा मिळाला असला तरी या पावसामुळे अनेक शेतक-यांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.
2 / 6
औरंगाबादमध्येही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
3 / 6
अचानक आलेल्या या पावसामुळे ब-याच ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचे दिसून आले.
4 / 6
अंधेरी विलेपार्ले कांदिवली तसेच दादर परिसरातही ढगांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत असून चाकरमान्यांचे मात्र मोठे झाले.
5 / 6
शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईतील वातावरण ढगाळ होते बोरिवली-कांदिवली परिसरात पावसाने हजेरी लावली. तर ठाणे तसेच वसई-विरार भागातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.
6 / 6
शुक्रवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह मुंबई व उपनगरांत तसेच राज्यभरात पावसाचे आगमन झाले. अचानक कोसळलेल्या पावसामुळे शहरात एक सुखद गारवा अनुभवयाला मिळाला. नाशिकमध्येही काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची त्रेधा उडाली. (छाया - दत्ता खेडेकर)