शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 09:55 IST

1 / 6
महाराष्ट्राची कन्या आणि पुणे येथील रहिवासी असलेल्या डायना पंडोले आता आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्ट्सच्या जगात भारताचे नाव उंचावण्यासाठी सज्ज झाली आहे.
2 / 6
नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित होत असलेल्या 'फेरारी क्लब चॅलेंज मिडिल ईस्ट'स्पर्धेत ती भाग घेणार असून पहिली भारतीय महिला रेसर म्हणून तिला मान मिळणार आहे.
3 / 6
फेरारी क्लब चॅलेंज मिडिल ईस्ट स्पर्धेत डायना पंडोले दुबई, अबू धाबी, बहरीन, कतार आणि सौदी अरबमधील प्रमुख फॉर्म्युला वन सर्किट्सवर 'फेरारी २९६ चॅलेंज' कार चालविणार आहे.
4 / 6
Ferrari 296 Challenge ही कार उच्च-कार्यक्षमता आणि ट्रॅक-केंद्रित मशीन आहे. ही फेरारीच्या सर्वात प्रगत रेसिंग कारपैकी एक असून ती वेगासाठी प्रसिद्ध आहे.
5 / 6
'फेरारी क्लब चॅलेंजमध्ये पहिली भारतीय महिला म्हणून सहभागी होणे, हा केवळ माझ्यासाठीच नाही, तर संपूर्ण भारतीय मोटरस्पोर्ट्समधील महिलांसाठी एक मोठा सन्मान आणि अभिमानाचा क्षण आहे. यामुळे अधिक महिलांना रेसिंगच्या जगात येण्याची प्रेरणा मिळेल', असे डायना पंडोले म्हणाली.
6 / 6
डायना पंडोले हिने रेसिंग कारकिर्दीची सुरुवात २०१८ मध्ये जेके टायर वूमन इन मोटरस्पोर्ट कार्यक्रमातून केली. अल्पावधीतच तिने अनेक रेसमध्ये पोडियम फिनिश (शीर्ष स्थान) मिळवून आपल्या प्रतिभेची छाप सोडली आहे.
टॅग्स :Ferrariफेरारी