By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 23:58 IST
1 / 5महाराष्ट्राचे लोकदैवत असण-या खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारीक पद्धतीने “मर्दानी दसर्याचे” आयोजन करण्यात येते, तब्बल 15 तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा खंडेरायाच्या गडावर संपन्न होत असतो. दस-याच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लघनाला गेल्यानंतर सुरु झालेला मर्दानी दसर्याची आज खंडा तलवारीचे मर्दानी खेळ संपन्न झाल्यानंतर समारोप झाला.2 / 5राज्यातील लाखो भाविक मर्दानी दसर्यासाठी खंडेरायाच्या गडावर दाखल झाले होते , अनेक वर्षापासून चालू असलेल्या ४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सारेच थक्क झाले.3 / 5येळकोट येळकोट ! जय मल्हार ! जल्लोष आणि भंडार्याच्या मुक्त उधळणीत उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्या खंडेरायाच्या जेजुरीचे, उभ्या महाराष्ट्रत जेजुरीच्या खंडेरायाच्या दसरा सोहळ्याला “मर्दानी दसरा” म्हणून ओंळखले जाते.4 / 5खंडेरायाचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत आधीच दाखल होतात... , जेजुरीकर सुद्धा वर्षभर कुठेही असले तरी “दसर्या निमित्त” गडावर येऊन सोहळ्यात सहभागी होतच असतात.5 / 5 मल्हारी मार्तंडाच्या वर्षभरात 12 मोठ्या यात्रा जरी भरत असल्या तरी या “दस-या ” च्या यात्रेला विशेष महत्व आहे.