शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पन्हाळ्याच्या सोमेश्वर तलावावरचा दिपोत्सव; पहा विलोभनीय फोटोंमधून...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 3:16 PM

1 / 6
इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव पन्हाळ्यावर सोमेश्वर तलाव, छ.संभाजी मंदिर,छ.शिवाजी मंदिर याठिकाणी दिपावली च्या पुर्व संधे ला कोल्हापूर हायकर्स यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत व हर्षल सुर्वे व इतर हजर होते
2 / 6
ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय तेच गड - किल्ले ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात. एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना मानवंदना देण्यासाठी दिपोत्सव करत असल्याचे हायकर्स चे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले
3 / 6
कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एक सांज पन्हाळगडवर स्वराज्याच्या गडकोटांवर एक सांज पन्हाळगडवर धनत्रयोदशी ची संध्याकाळ या संकल्पनेतून वर्षभर अपरिचित गड किल्ल्यावर ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून या ग्रुपची ओळख. बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते.
4 / 6
प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात नेहमीच पुढे असतात. आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या दहा वर्षापासुन पन्हाळा गडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जात आहे
5 / 6

6 / 6

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022