शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अबब! विद्यार्थ्याच्या तोंडातून काढला जगातील सर्वात मोठा दात; लांबी पाहून डॉक्टरही झाले चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 3:24 PM

1 / 10
मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये इंजिनिअर करणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या तोंडातून ३९ मिमी लांबीचा दात काढला. हा जगातील सर्वात मोठा मनुष्याचा दात आहे असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
2 / 10
या दाताची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार आहे. इंजिनिअर विद्यार्थ्यांच्या तोंडातून एवढा मोठा दात बाहेर काढल्याने खरगोनमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
3 / 10
या दाताची लांबी ३९ मिलीमीटर आहे. आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ३७.३ मिलीमीटरच्या मोठ्या दाताची नोंद आहे अशी माहिती डॉ. सौरभ श्रीवास्तव यांनी दिली.
4 / 10
गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये २०१९ मध्ये जर्मनीतील डेंटिस्ट मैक्स लुक्स यांच्यावर नावावर सर्वात मोठा दात काढण्याचा रेकॉर्ड आहे. लुक्स यांनी ३७.२ मिमी लांबीचा दात काढला होता.
5 / 10
डॉक्टर मैक्स लुक्स यांनी गुजरातमधील डॉ. जमिन पटेल यांचा ३६.७ मिमी लांबीचा दात काढण्याचा रेकॉर्ड मोडला होता.
6 / 10
आता जर्मनीतील डॉक्टर लुक्स यांचा रेकॉर्ड मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील डॉ. सौरभ श्रीवास्तव यांनी मोडल्याचा दावा केला आहे.
7 / 10
२९ फेब्रुवारीला डॉ. सौरभ श्रीवास्तव यांच्याकडे इंजिनिअरचा विद्यार्थी पवन भावसार दात दाखवण्यासाठी आला होता. मोठ्या दातामुळे पवनचा चेहरा चांगला दिसत नसल्याने तो चिंतेत होता.
8 / 10
पवनचा ८ दिवसांपूर्वी दात काढण्यात आला. त्याची लांबी ३६ मिमी होती. मात्र दुसरा दात दुख:त होता तो पुन्हा डॉ. सौरभ यांच्याकडे आला. त्यावेळी दुसरा दात काढला त्याची लांबी ३९ मिमी. होती.
9 / 10
३९ मिमी जगातील सर्वात मोठा दात आहे असा दावा डॉक्टर सौरभ श्रीवास्तव यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डसाठी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
10 / 10
सामान्यपणे दाताची लांबी २८ मिमी इतकी असते. मात्र या दाताची लांबी खूपच जास्त आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
टॅग्स :doctorडॉक्टर