जुळे भाऊ ऑपरेशन करून बनल्या बहिणी, आजोबांनी प्रॉपर्टी विकून सर्जरीसाठी दिले पैसे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 10:31 IST
1 / 10ब्राझीलमध्ये राहणाऱ्या दोन जुळ्या भावांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त गोष्टी सोबतच केल्या आहेत आणि दोघांनी सोबतच ट्रान्सजेंडर ऑपरेशन करून रेकॉर्ड कायम केला आहे. १९ वर्षीय दोन्ही जुळे भाऊ जेंडर सर्जरी करून मुली झाले आहेत. 2 / 10मायला आणि सोफियाचं मत आहे की, त्यांना बालपणापासून मुलांसारखं काहीच फिल होत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांनी हे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.3 / 10ब्राझीलच्या दक्षिण-पूर्व शहर ब्लूमेगोमधील एका ट्रान्सजेंडर सेंटरमधून दोघांनी आपली सर्जरी केली. या सेंटरचे डॉक्टर जोसे कार्लोस म्हणाले की, ही जगातली पहिली अशी रिपोर्टेड केस आहे ज्यात दोन जुळ्या भावांनी एकत्र सर्जरी करून मुली होण्याचा निर्णय घेतला. 4 / 10या सर्जरीच्या एक आठवड्यानंतर दोघांनी एएफपीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बातचीत केली.5 / 10मायला अर्जेंटिनामध्ये मेडिसिनचं शिक्षण घेत आहे. ती म्हणाली की, मला नेहमीच माझं शरीर चांगलं वाटत होतं. पण मुलगा होऊन मला अवघडल्यासारखं वाटायचं. 6 / 10मायला आणि सोफिया दोघींनी सांगितले की, कशाप्रकारे त्यांना सेक्शुअल हरॅसमेंट, हिंसा आणि टोमण्यांचा सामना करावा. आणि कशाप्रकारे त्यांनी या स्थितीत एकमेकींची साथ दिली.7 / 10साओ पॉलोमध्ये सिविल इंजिनिअरींगचं शिक्षण घेणारी सोफिया म्हणाली की, ब्राझीलमध्ये ट्रान्सफोबिया जास्त आहे. लोक इथे ट्रान्सजेंडर्सना फार त्रास देतात. 8 / 10दरम्यान नॅशनल असोसिएश ऑफ ट्रान्ससेक्शुअल्सच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी ब्राझीलमध्ये १७५ लोक मारले गेले होते आणि ही आकडेवारी इतर देशाच्या तुलनेत खूप जास्त आहे.9 / 10सोफिया म्हणाली की, आमच्या निर्णयाबाबत आई-वडील नेहमीच सपोर्टिंव राहिले आहेत. पण त्यांना भीती होती की, लोक आमची खिल्ली उडवतील आणि आम्हाला त्रास देतील. 10 / 10आमच्या आजोबांनी सर्जरीसाठी पैसे दिले होते. २० हजार डॉलरच्या या सर्जरीसाठी त्यांनी त्यांची प्रॉपर्टी विकली होती.